आजादी के 73 सालों का सफरनामा’ या विषयावर मानखुर्द – गोवंडीत संवाद व परिचर्चेचे आयोजन करण्यात आले

दि. 15/08/2020 रोजी मानखुर्द – गोवंडीमध्ये वरील विषयावर आयोजित केलेल्या परीचर्चेत महाविद्यालयीन तरुणांसोबतच कामगारांनीदेखील हिरीरीने सहभाग घेतला. क्रांतिकारी गीतांच्या प्रस्तुतीबरोबरच स्वातंत्र्याबद्दल अतिशय मार्मिक पणे बोलणाऱ्या कवितांचे वाचन केले गेले ज्यात सर्वेश्वर दयाल सक्सेना यांची ‘देश कागज पे बना नक्षा नहीं होता’, नागार्जुन यांची ‘किसकी है जनवरी, किसका होऊ अगस्त’ यांचा समावेश होता. त्यानंतर चर्चेला सुरवात करत अविनाश यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीची मांडणी केली, ज्यात इंग्रजांनी कशाप्रकारे भारतात आगमन करून भारतीय राजकारणात हस्तक्षेप करत 1757 मध्ये प्लासी आणि 1758 मध्ये बक्सर येथील युद्ध जिंकून बंगालच्या नवाबला नाममात्र बनवत भारतावर आपले वर्चस्व स्थापित केले व त्यानंतर ‘ तोडा आणि फोडा ‘ चे राजकारण करून भारतीयांना कशाप्रकारे विभाजित केले, ह्यावर प्रकाश टाकण्यात आला. जेव्हा स्वातंत्र्यासाठी भारतीय जनतेचा दबाव वाढत होता तेव्हा सर ऍलन ह्यूम ह्या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या मदतीने स्थापना केलेल्या काँग्रेस पक्षाला सोयिस्करपणे सत्ता हस्तांतरित करुन इंग्रजांनी भारतातून जाण्याच्या निर्णय घेतला, ह्या दरम्यान घडलेल्या राजकीय घडामोडींवर देखील चर्चा करण्यात आली.
‘संविधान सभेसाठी केवळ 11.5 टक्के लोकांचे प्रतिनिधी असलेल्या नेत्यांची निवड, त्यानंतर ब्रिटिश काळातील 1935 मधील government of India act 1935 इत्यादी बाबींचा प्रभाव’, यावर चर्चा करत स्वातंत्र्योत्तर कालखंडात सत्तेत येऊन गेलेल्या कामगार कष्टकरी विरोधी सर्वच भांडवली पक्षांच्या सरकारांच्या खऱ्या चारित्र्या विषयी मांडणी करण्यात आली.
चर्चेच्या शेवटी नौजवान भारत सभेच्या शहिदांच्या स्वप्नपूर्तीप्रति एकनिष्ठ असलेले क्रांतिकारी विचार , संघटनेचे ध्येय, धोरण आणि उद्दिष्ट यांबाबत भूमिका मांडण्यात आली. फैज अहमद फैज यांच्या ‘सुबह ए आझादी’ ह्या कवितेने चर्चा संपवण्यात आली.

Related posts

Leave a Comment

5 + 7 =