28 सप्टेंबर- शहीदे आझम भगतसिंह यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने नौजवान भारत सभा आणि स्त्री मुक्ती लीग तर्फे “द लेजेंड ऑफ भगतसिंह” चित्रपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले

28 सप्टेंबर- शहीदे आझम भगतसिंह यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने नौजवान भारत सभा आणि स्त्री मुक्ती लीग तर्फे “द लेजेंड ऑफ भगतसिंह” चित्रपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले. चित्रपट बघायला वस्तीतली लहान मुलेसुद्धा सहभागी झाली. चित्रपटानंतर चित्रपटाबद्दल तसेच भगतसिंहांच्या आयुष्याबद्दल चर्चा करण्यात आली.
आपले मत मांडताना साथी सिद्धार्थने सांगितले की भगतसिंह हे वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी फासावर गेले. देशाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळावे म्हणून त्यांनी त्यांच्या प्रणांचीही पर्वा केली नाही. हे खूपच प्रेरणा देणारे आहे. आजकाल लोकांना भगतसिंह यांचे नाव माहिती असते पण त्यांचे काय विचार होते हे माहिती नसते अशी खंतही त्याने मांडली. साथी अश्विनीने सांगितले की चित्रपट कितीही वेळा पाहिला तरीही तो तितकाच प्रेरणादायी वाटतो. भगतसिंह यांना अन्यायाप्रती असलेली चीड आणि त्यासाठी संघर्ष करण्याची वृत्ती खूप विलक्षण वाटते हेही मांडले. साथी रुपेशने मांडले की भगतसिंह आणि त्यांचे कार्य शाळांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये शिकवत नाहीत. यावर आजच्या सत्ताधाऱ्यांना सुद्धा भगतसिंह यांच्या विचारांपासून धोका आहे त्यामुळेच ते क्रांतिकारकांचा खरा इतिहास लपवतात असे मत साथी सुस्मितने मांडले. पुढे मत मांडताना साथी सुस्मितने सांगितले की चित्रपटामध्ये भगतसिंह यांचा राजकीय प्रवास पूर्णपणे दाखवला आहे. भगतसिंह आणि त्यांच्या साथीदारांनी जेलमध्ये असताना सुद्धा अन्यायविरोधात लढणे सोडले नाही हे मांडले. तसेच त्यांनी दिलेला नारा ‘ जाती- धर्माचे झगडे सोडा, खऱ्या लढाईशी नाते जोडा’ आजसुद्धा किती प्रासंगिक आहे ते मांडले. चित्रपटाला कलात्मक रित्या अजून चांगल्या प्रकारे बनवता आले असते, काही ठिकाणी चित्रपटाला कलात्मक करताना वास्तवापासून तो थोडा दूर जातो अशी टीकासुद्धा मांडली.
भगतसिंह यांनी लिहिलेले साहित्य वाचण्याचा निर्धार करून ‘इंकलाब जिंदाबाद’ या घोषणेने कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला.
नौजवान भारत सभा आणि स्त्री मुक्ती लीग शहिदांचा वैचारिक वारसा पुढे नेण्यासाठी सतत संघर्षरत आहे. एका न्यायप्रिय आणि समतामुलक समाजाच्या निर्मितीसाठी विद्यार्थी तरुण, तरुणींनी संघटित होऊन मूलभूत प्रश्नांवर लढण्याचे आवाहन नौभास आणि स्त्री मुक्ती लीग करते.
शहीद स्मृती संकल्प अभियानाचा भाग व्हा आणि आर्थिक सहयोग सुद्धा करा. पथनाट्य, पोस्टर प्रदर्शन, चर्चासत्र, चित्रपट स्क्रिनिंग अशा विविध कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी संपर्क करा.
नौजवान भारत सभा : 8329869421
स्त्री मुक्ती लीग : 8097561533

Related posts

Leave a Comment

1 × 4 =