मित्रांनो, नौजवान भारत सभेच्या केंद्रीय परिषदेची बैठक 20 ते 22 जुलै 2024 रोजी रोहतक (हरियाणा) येथे आयोजित केली गेली. संघटनेच्या दुसऱ्या परिषदेनंतर ही आमची दुसरी बैठक होती. या बैठकीत संघटनेच्या देशभरातील कामांचा आढावा घेऊन विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत संघटनेच्या तात्कालिक, चालू आणि दूरगामी योजनांवर विचारविमर्श केला गेला.
परिषदेच्या या बैठकीत दोन मुद्यांवर प्रस्ताव पारित केले गेले आणि विविध मुद्दांवर भूमिका निर्धारित केल्या गेल्या. पेपरफुटी आणि परीक्षेत होणाऱ्या हेराफेरीच्या विरोधात नौभाससह इतर संघटनांनी मिळून राबवलेले अभियान यशस्वीपणे पार पाडण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला. येणाऱ्या ९ ऑगस्ट रोजी एका भव्य प्रदर्शनाद्वारे दिल्लीतील जंतरमंतर येथे या अभियानाचा शेवट होणार आहे.
बैठकीत पॅलेस्टिनी लोकांच्या मुक्ती संग्रामाच्या समर्थनार्थ ठराव मंजूर करण्यात आला. याशिवाय वाढती बेरोजगारी, महिलांवर होणारे अत्याचार, पर्यावरणाचा ऱ्हास, जातीयवाद, बांगलादेशी विद्यार्थी आंदोलन अशा विविध मुद्द्यांवर भूमिका जाहिर केल्या गेल्या.
नवे संकल्प हाती घेऊन परिषदेच्या बैठकीचा समारोप झाला!
