अग्निपथ योजनेला फासीवादी मोदी सरकारच्या खाजगीकरण, कंत्राटीकरणाच्या योजनांचे पुढचे पाऊल समजले पाहिजे. लष्कर आणि निमलष्करी दलात कंत्राटीकरण आणल्याने बेरोजगरीने त्रस्त युवकांचा असंतोष उफाळून आला आहे. आज देशातल्या सगळ्याच तरूणांसमोर रोजगाराचा प्रश्न आ वासून उभा आहे. अशा वेळेस सगळ्या तरुणांनी अग्निपथ योजनेविरोधात आंदोलन करणाऱ्या तरूणांना पाठिंबा दिला पाहिजे आणि रोजगाराच्या अधिकारासाठी संघटित झाले पाहिजे.
नौजवान भारत सभा ही मागणी करत आहेत की:
1. ‘अग्निपथ’ योजनेला तात्काळ कचरापेटी दाखवावी कारण हा देशातील युवकांच्या रोजगाराच्या प्रमुख स्रोतावर हल्ला आहे आणि त्यांच्या ठेकेदारीकरणाची तयारी आहे.
2. सर्व सैनिकी आणि अर्धसैनिकी दलांमध्ये तसेच केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये रिक्त असलेल्या जवळपास 1,65,000 पदांवर तात्काळ भरती केली जावी आणि त्या सर्व सवलती आणि अधिकार त्यांना दिले जावेत जे आजवर दिले जात होते.
3. ‘अग्निपथ’ च्या अन्यायपूर्ण आणि षडयंत्रकारी योजनेविरोधात आंदोलन करणाऱ्या युवकांची अटक बंद केली जावी, अटक केलेल्यांना तात्काळ मुक्त केले जावे आणि त्यांच्यावर लावलेले सर्व खटले तात्काळ विनाशर्त हटवले जावेत.
4. देशातील सर्व सरकारी विभागांमध्ये सर्व रिक्त पदांवर तात्काळ भरती केली जावी, सर्व प्रलंबित परीक्षा तात्काळ घेतल्या जाव्यात, जिथे परीक्षा झाल्या आहेत, तिथे तात्काळ भरती प्रक्रिया सुरू केली जावी.
5. सशस्त्र दल आणि पोलिसातील सामान्य शिपायांसोबत गैरवर्तणूक आणि गुलामांसारखा व्यवहार तात्काळ नियम बनवून संपवला जावा.
6. सर्व प्रकारच्या सशस्त्र दलांना मूलभूत राजकीय अधिकार दिले जावेत जे भारताच्या कोणत्याही नागरिकाला दिले जातात, उदा, आपल्या मागण्या आणि अधिकारांसाठी युनियन बनवण्याचा अधिकार, आणि इतर लोकशाही अधिकार.
7. देशातील सर्व नागरिकांसाठी रोजगार हमी कायदा (भगतसिंह राष्ट्रीय रोजगार हमी कायदा, Bhagatsingh National Employment Guarantee Act, BSNEGA) बनवला जावा आणि रोजगाराचा अधिकार मूलभूत अधिकार बनवला जावा.
8. देशामध्ये सामान्यपणे नियमित प्रकारच्या सर्व कामांमध्ये ठेकेदारी पद्धत संपवली जावी.
9. नवीन पेन्शन योजना ‘एनपीएस’ तत्काळ रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू केली जावी.
10. सर्व प्रकारच्या सशस्त्र दलांना शांततेच्या काळात उत्पादक कामांमध्ये लावले जावे आणि व्यापक कामकरी जनतेपासून आणि सामाजिक जीवनापासून त्यांचा अलगाव संपवला जावा.
नौजवान भारत सभा
