नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे ‘मणिपूर : राजकीय इतिहास आणि वर्तमान हिंसेची कारणं’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केले गेले.

26 जून रोजी, नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे ‘मणिपूर : राजकीय इतिहास आणि वर्तमान हिंसेची कारणं’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केले गेले. मैतेई आणि कुकी समुदायातील लोकांमध्ये सुरू असलेल्या या संघर्षात 50,000 लोक विस्थापित झाली आहेत तर 130 लोकांचा मृत्यू झाला आहे. इंटरनेट सुविधा गेल्या २ महिन्यांपासून बंद आहेत. “कायदा आणि सुव्यवस्था” पूर्णपणे कोलमडून गेली आहे. सरकार आणि पोलीस पक्षपातीपणा करत आहेत असाही आरोप लावला जात आहे. गेले 2 महिने मणिपूर मध्ये सुरू असलेल्या हिंसे बद्दल बोलताना आशय म्हणाला की यात मूळ मुद्दा हा संपत्ती साधनांच्या वाटपाचा आहे. मणिपूरच्या भौगोलिक परिस्थतीनुसार 90% जमीन डोंगरी आहे आणि 10% जमीन मैदानी आहे, पण मैदानी भागात एकूण लोकसंख्येतील 60% लोक राहतात, तर डोंगरी भागात 40% लोकं राहतात. डोंगरी भागात कुकी आणि नागा लोक राहतात, तर मैदानी भागात प्रामुख्याने मैतेई लोक राहतात. भांडवली विकासामुळे आता मैतेई, कुकी आणि नागा, सर्वांमध्ये एक भांडवलदार वर्ग निर्माण झाला आहे. या वेग-वेगळ्या राष्ट्रीयतेच्या भांडवलदार वर्गांना जास्तीत जास्त संपत्ती साधनं स्वतःच्या नियंत्रणात पाहिजे आहेत. प्रज्ञा म्हणाली की 2 महिने सुरू असलेल्या हिंसेबद्दल प्रधानमंत्री मोदींनी एक शब्द सुद्धा उच्चारला नाही, जेव्हा की ही केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारची खूप मोठी विफलता आहे. सुप्रीथ म्हणाला की इंटरनेट सुविधा बंद असल्यामुळे मणिपूर मधून माहिती बाहेर उशिरा पोहचते आणि मणिपूर मध्ये सुद्धा अफवा पसरत आहेत.

Related posts

Leave a Comment

sixteen + 17 =