अय्यंकाली यांच्या 161 व्या जन्मदिनानिमित्त त्यांना क्रांतिकारी अभिवादन!

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

महान अय्यंकाली यांच्या
वारशाला लक्षात ठेवा! क्रांतिकारी जातिअंताच्या आंदोलनाला पुढे न्या!
साथींनो!

आपल्यापैकी कदाचित काही जणांनीच महान जाती-विरोधी योद्धे अय्यंकाली यांचे नाव ऐकले असेल. याचे कारण समजून घेता येऊ शकते. अय्यंकाली त्या जाती-विरोधी योद्ध्यांपैकी होते, ज्यांनी ब्राह्मणवादी आणि त्यांच्या सत्तेपासून समानतेचा अधिकार मिळवण्यासाठी एक झुंझार लढाई लढली आणि यशस्वी झाले. त्यांनी त्या सरकारची वाट पाहिली नाही, जे सरकार क्वचितच ब्राह्मणवादी आणि उच्चजातीय सामंतांच्या विरोधात जात होते; कारण सुरूपासून अंतापर्यंत सामंती ब्राह्मणवादी शक्ती या ब्रिटीश सत्तेचे पाय चाटणाऱ्या आणि समर्थक होत्या. अय्यंकाली यांनी सुधारणांसाठी अर्ज विनंत्यांचे काम नाही केले, उलट सडकेवर उतरून ब्राह्मणवाद्यांना खुले आवाहन दिले आणि त्यांना हरवले सुद्धा. अय्यंकालींनी सिद्ध केले की दडपलेली आणि अत्याचार झालेली लोकं ना फक्त लढू शकतात, तर जिंकू सुद्धा शकतात. अय्यंकालींचा संघर्ष आज जातीअंताच्या लढ्यासाठी अत्यंत प्रासंगिक आहे. आज अय्यंकालींच्या संघर्षाची आठवण काढणे जातीअंताच्या आंदोलनाला सुधारवाद आणि व्यवहारवादाच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी जरूरी आहे.

Related posts

Leave a Comment

seventeen + 2 =