बेरोजगारीच्या प्रश्नावर नौजवान भारत सभेतर्फे आयोजित व्याख्यान

रविवार २३ जानेवारी रोजी पुण्यातील सुप्पर बिबवेवाडी येथे ‘बेरोजगारी: मूळ समस्या व उपाय’ ह्या विषयावर नौजवान भारत सभेतर्फे राजकीय अर्थशास्त्राचे अभ्यासक अभिजीत अ. मि. ह्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रास्ताविक करताना साथी निमिष ह्यांनी नौजवान भारत सभेचा विचार व कार्य उपस्थितांसमोर मांडले व आज, आपला समाज एका सर्वव्यापी संकटातून जात असताना समाज परिवर्तनासाठी तरुणांनी एकत्र येऊन कामगार कष्टकऱ्यांपर्यंत योग्य विचार पोचवण्याची गरज अधोरेखित केली. त्यानंतर साथी सुस्मित ह्यांनी बेरोजगारीचे संकट व आजच्या कामगार-कष्टकरी वर्गाची परिस्थिती उपस्थित तरुणांसमोर मांडली. व्याख्यानात प्रा. अभिजित ह्यांनी सर्वप्रथम विविध आकडेवारी मांडत बेरोजगारीच्या संकटाची व्याप्ती तरुणांसमोर उलगडली. त्यांनतर लोकसंख्या, आरक्षण इत्यादी बेरोजगारीसाठी दिल्या जाणाऱ्या चुकीच्या कारणांची पोलखोल केली. आजच्या भांडवली व्यवस्थेत सर्वच कारभार हा नफ्यासाठी केला जातो. जनतेच्या गरजा भागवण्यासाठी किंवा तरुणांना रोजगार देण्याच्या हेतूने आज कुठलाही उद्योग काम करत नाही, तर मूठभर मालकांचे नफे वाढवत राहिले पाहिजेत ह्याचसाठी हि संपूर्ण व्यवस्था आज काम करते. रोजगाराकरिता आजचे युवक नालायक आहेत असे नाही, तर युवकांना रोजगार देण्यात आजची नफाकेंद्री व्यवस्थाच नालायक आहे. त्यामुळेच आज तरुणांनी व कामगार कष्टकऱ्यांनी एकजूट होऊन रोजगाराच्या अधिकारासाठी लढले पाहिजे असे अभिजित ह्यांनी मांडले.

Related posts

Leave a Comment

3 × five =