७ मार्च रोजी साठे नगर, मानखुर्द येथे नौजवान भारत सभा (नौभास) चे सहयोग अभियान चालवण्यात आले.

अभियानात लोकांना आपल्या शहिदांच्या स्वप्नांची आठवण करून दिली गेली. भगत सिंह, सुखदेव, राजगुरू, ज्या स्वातंत्र्यासाठी लढले होते ते आज ही आपल्याला मिळाले नाहीये. शिक्षणाचे बाजारीकरण आज कामगार कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षणापासून दूर करत आहे. बेरोजगारी ची अवस्था इतकी वाईट आहे की आज ३२ कोटी तरुण बेरोजगार आहेत. आणि अशा मुद्द्यांवर युवकांनी सत्तेत बसलेल्या धनदांडग्यांना जाब विचारू नये  म्हणून त्यांच्यात जाति धर्माची भांडण लावली जात आहेत. अभियानात नौजवान भारत सभेच्या विविध क्रांतीकारी सुधार कामांबद्दल लोकांना सांगितले गेले जसे की शहिद राजगुरू शिक्षण सहायता केंद्र, शहिद सुखदेव फिरते वाचनालय, त्याच सोबत सध्या दहावीच्या मुलांसाठी सुरु असलेल्या क्रॅश कोर्स बद्दल लोकांना माहिती दिली गेली. नौजवान भारत सभा आपला संपूर्ण खर्च जनतेच्या सहयोगावर चालवते आणि कोणत्याही एन जी ओ, कॉर्पोरेट हाऊस, किंवा निवडणूक बाज भांडवली पक्षाकडून एक रुपया घेत नाही. अभियानात नौभास च्या कामांसाठी लोकांना त्यांच्या महत्त्वाच्या खर्चातून कपात करून सहयोग करण्याचे आह्वान केले गेले. लोकांनीही अभियानाला सकारात्मक प्रतिसाद दिला व नौभास सोबत जोडून घेण्याची इच्छा दर्शवली. यापुढेही असे अभियान नियमित रूपाने चालवले जाईल. तुम्हीही नौजवान भारत सभेचे सदस्य बना आणि एका समतामूलक समाजाच्या जडणघडणीत आपले योगदान द्या. संपर्क- 99300 95381 For Financial Contribution : Account Details AVINASH KUMAR STATE BANK OF INDIA. A/C NO. – 33887284635 IFSC CODE – sbin0016612 Google pay/Phone pay: 8826265960

Related posts

Leave a Comment

19 − 7 =