सावित्री – फातिमा स्मृती संकल्प अभियानांतर्गत मुंबईच्या चेंबूर येथील महाविद्यालयात माहितीपटाचे स्क्रिनिंग आणि चर्चासत्राचे आयोजन!

नौजवान भारत सभा, दिशा विद्यार्थी संघटना आणि स्त्री मुक्ती लीग तर्फे सावित्रीबाई फुले आणि फातिमा बी शेख यांच्या जन्मदिवसानिमित्त सावित्री – फातिमा समृती संकल्प अभियान आयोजित करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी चेंबूर येथील महाविद्यालयात ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित माहितीपटाचे प्रदर्शन करण्यात आले. या माहितीपटात जातीवादी व पितृसतात्मक समाजाच्या विरोधात ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या संघर्षाबद्दल माहिती देण्यात आली आहे. महिला आणि दलितांसाठी पहिली शाळा सुरू करण्यापासून ते ब्राह्मणवादी रूढी परंपरांच्या विरुद्ध उभे केलेले संघर्ष आणि सत्यशोधक समाज स्थापन करण्यापर्यंतचा संघर्ष या माहितीपटाद्वारे दाखवण्यात आला. माहितीपट दाखवल्यानंतर विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला गेला. आज आपल्या क्रांतिकारकांच्या विचारांना आणि त्यांच्या इतिहासाला जाणून घेण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. सावित्रीबाई फुले, फातिमा शेख आणि ज्योतिराव फुले यांनी जाती व्यवस्था आणि पितृसत्तेविरुद्ध जो संघर्ष सुरू केला होता तो आज सुद्धा अपूर्ण आहे. आज समाजामध्ये फॅशिस्ट संघटना जातिवाद आणि पितृसत्तेसारख्या विचारसरणीचा वापर करून जनतेला जाती – धर्माच्या नावाखाली विभागून ठेवण्याचे काम करत आहेत. जेणेकरून युवकांना शिक्षण आणि रोजगाराच्या हक्कापासून वंचित ठेवून, धर्मांध दंगली भडकवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. म्हणून आज विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक पद्धतीने समाजाचा खोलवर अभ्यास करून त्याला बदलण्याच्या प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभाग घेण्याची गरज आहे. नौजवान भारत सभा, दिशा विद्यार्थी संघटना आणि स्त्री मुक्ती लीगने याच उद्दिष्टाने सावित्री – फातिमा स्मृती संकल्प अभियान आयोजित केले आहे. आम्ही सर्व विद्यार्थी, युवक आणि संवेदनशील नागरिकांना या अभियानामध्ये सामील होण्याचे आवाहन करतो. सावित्री – फातिमा स्मृती संकल्प अभियानात सामील होण्यासाठी संपर्क: 7667230795, 7588733724

Related posts

Leave a Comment

nineteen − nine =