नौजवान भारत सभा (नौभास) च्या केंद्रीय परिषदेची बैठक हैदराबादमध्ये यशस्वीरित्या पार पडली!

Central Council meeting

Central Council meetingसाथींनो, नौजवान भारत सभेच्या केंद्रीय परिषदेची बैठक ६ ते ८ जुलै २०२५ दरम्यान हैदराबाद (तेलंगणा) येथे यशस्वीरित्या पार पडली. या बैठकीत रोजगार, शिक्षण, सध्याची सामाजिक परिस्थिती आणि युवक चळवळीसमोर उभ्या असलेल्या आव्हानांवर सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान संघटनेच्या गतकार्याचा आढावा घेण्यात आला. संघटनेचे काम अधिक व्यापक आणि प्रभावी करण्यासाठी तातडीच्या तसेच दीर्घकालीन योजनांची आखणी करण्यात आली. सदस्यता मोहीम, प्रचारकार्य आणि आंदोलनात्मक उपक्रम यांचे आराखडे ठरवण्यात आले.
परिषदेनं अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर ठराव संमत केले आणि गरजूं विषयांवर निवेदने जाहीर केली. येत्या काळात नौजवान भारत सभा विद्यार्थी, युवक आणि व्यापक जनतेचे जीवन प्रभावित करणाऱ्या मुद्द्यांवर अधिक तीव्र प्रचार आणि आंदोलनात्मक मोहिमा राबवणार आहे.
नव्या जोमाने आणि दृढ निश्चयाने देशातील युवकांना भगतसिंह यांच्या क्रांतिकारी विचारांची जाणीव करून देण्यात येईल. त्यांना व्यापक सामाजिक परिवर्तनाच्या क्रांतिकारी कार्यक्रमाशी जोडण्यासाठी नौभास सक्रियपणे काम करेल.

“भगतसिंहांनी दिला आवाज –
बदला बदला, देश समाज!
जाती-धर्माचे झगडे सोडा,
खऱ्या लढ्याशी नाते जोडा!”

– केंद्रीय परिषद
नौजवान भारत सभा

Related posts

Leave a Comment

eighteen − six =