गोवंडी-मानखुर्द (मुंबई) येथील रफीक नगर, गौतम नगर भागांत नौजवान भारत सभेतर्फे राशन वाटप

कोरोनामुळे करण्यात आलेल्या टाळेबंदीचा फटका देशभरातील कामगार-कष्टकरी जनतेला बसला आहे.

हाताला काम नाही आणि महागाई दिवसेंदिवस नवीन उंची गाठत आहे. अश्या परिस्थितीत रोजंदारीवर काम करणाऱ्यांपासून ते छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्या जनतेला एका वेळचे जेवण देखील अशक्यप्राय झाले आहे.

साथीचा आजार व कोलमडलेले आर्थिक समीकरण यांमुळे त्रस्त असणाऱ्या कामगार कष्टकरी, गरीब जनतेप्रती असलेली जबाबदारी पूर्ण करण्यास *राज्यातील ठाकरे सरकार व केंद्रातील मोदी सरकार पूर्णतः अयशस्वी ठरले आहे.
_ह्याच धर्तीवर नौजवान भारत सभेने ऐन टाळेबंदीच्या काळात स्थानिक कामगार कष्टकऱ्यांच्या मदतीने गोवंडीत साडे तीन महिने सामूहिक स्वयंपाकगृह चालवले, तसेच सतत मदतकार्य सुरू ठेवले आहे._

सामान्य जनतेला अधिकार आणि हक्कांपासून वंचित ठेवणाऱ्या केंद्र व राज्य सरकारचे मालकवर्गाप्रतीच निष्ठा बाळगणारे भांडवली चरित्र लोकांसमोर आज स्पष्ट झाले आहे.

देशभरात राबविण्यात आलेले कामगार संघर्ष संकल्प अभियान गोवंडी येथे नौजवान भारत सभेकडून चालवण्यात आले, ज्यात आपल्या हक्कांसाठी संघर्षाची गरज आणि संघर्षासाठी कामगार वर्गीय एकजुटीचे आव्हान करण्यात आले.

कष्टकरी गरीब जनतेच्या परिस्थितीत आजही तिळमात्र बदल नाही, म्हणूनच न्यायप्रिय लोकांच्या श्रम सहयोग व आर्थिक सहयोगाच्या जोरावर नौजवान भारत सभेकडून पुन्हा एकदा राशन वाटपाचे काम करण्यात आले.

नौजवान भारत सभेच्या कामांसाठी आपणही अधिकाधिक शक्य आर्थिक सहयोग नक्की करावा. आर्थिक सहयोगासाठी तपशील पुढील प्रमाणे :-

Name: Pooja Vijay Chinchole

Account number: 0925010406826

Bank :United bank of India

Branch name: Deccan gymkhana

IFSC: UTBI0DEC632

Google pay: 7588733724

नौजवान भारत सभेच्या अभियानांमध्ये व कामांमध्ये सामील होण्यासाठी सम्पर्क करा.

डॉ.पूजा 7057088323

बबन ठोके 9619039793