नौजवान भारत सभा (नौभास), पुणे तर्फे फिरते वाचनालय संचालित
साथींनो,
पुणे शहरातील विविध वस्त्यांमध्ये राहणाऱ्या कष्टकरी-कामगार वर्गापर्यंत ज्ञानाचा वारसा पोहोचवण्यासाठी नौजवान भारत सभा फिरते वाचनालय गेल्या 2 महिन्यांपासून चालवत आहे. याचा भाग म्हणून नौभासचे साथी झोळीमध्ये पुस्तके घेऊन दारोदारी जातात आणि जनतेला पुस्तके उपलब्ध करुन देतात. अपेक्षेपेक्षा अत्यंत चांगला प्रतिसाद या वाचनालयाला मिळत आहे आणि अनेक पुस्तकांची मागणी लोकांकडून येत आहेत.
नौभासचे संपूर्ण काम फक्त जनसहयोगातूनच चालते. आंबिलओढा परिसरातील वाचनालय सुद्धा आपल्या सहयोगातूनच सुरू होऊ शकले. सध्या फिरत्या वाचनालयाकरिता जास्तीत जास्त पुस्तके घेण्याचा प्रयत्न आहे. आम्ही आपणास आवाहन करत आहोत की नौभासच्या कामांना जास्तीत जास्त आर्थिक सहयोग करावा.
आपण जाणताच की नौजवान भारत सभा सतत युवकांमध्ये क्रांतिकारी विचारांच्या प्रसारासाठी आणि “जनतेची सेवा करा” या नाऱ्याला घेऊन आणि “क्रांतीचा हा संदेश तरुणांनी देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवायचा आहे. गिरण्या कारखान्यांची क्षेत्रे, शहरातील गलिच्छ वस्त्या आणि खेड्यातील जीर्ण झोपड्या यामध्ये राहणाऱ्या कोट्यावधी लोकांमध्ये तरुणांनी क्रांतीची चेतना जागवली पाहिजे.” या भगतसिंहाच्या संदेशाच्या अंमलबजावणीसाठी कटिबद्ध संघटना आहे. बेरोजगारी, जातीय अत्याचार, विद्यार्थी युवकांच्या प्रश्नांसोबतच, पूरग्रस्तांचे प्रश्न, कोव्हिड काळात मदत कार्यापासून ते आपदाग्रस्तांकरिता मदतकार्य, सीएए-एन-आर-सी सारख्या प्रश्नांपर्यंत सतत संघर्षरत रहात असतानाच, पुण्यातील आंबिलओढा परिसर तसेच मुंबई व अहमदनगर येथे सतत वाचनालय चालवली गेली आहेत. आता फिरत्या वाचनालयाच्या स्वरूपात सुद्धा कामांचा विस्तार आम्ही करत आहोत. आपल्या सहयोगानेच नौभासच्या कामांचा विस्तार होऊ शकतो. त्यामुळे आम्ही आपणास जास्तीत जास्त सहयोगाचे आवाहन करत आहोत.
आर्थिक सहयोगासाठी आवाहन
अ) बॅंक अकाउंट
Name: Ravishankar Purne
HDFC bank, Hinjawadi branch
Acc/no: 50100240225836
IFSC: HDFC0000794
ब) गुगल पे
Google Pay
UPI: ravismail96@okhdfcbank
Mobile: 8956840785
क) फोन पे
PhonePe
UPI: ravishankarbm@ybl
Mobile: 8956840785
आपण निधी पाठवल्यावर कृपया वरील फोन नंबरवर एक मेसेज करुन कळवणे. पावती आपल्या पर्यंत पोहोचवण्याची सोय आम्ही करु.

