आज भारताच्या क्रांतिकारी आंदोलनच्या मजबूत साथीदार आणि शहीद भगतसिंहांचे साथी भगवतीचरण वोहरांच्या जीवनसाथी दुर्गा भाभींचा जन्मदिवस आहे.
दुर्गा भाभींचा जन्म 7 ऑक्टोबर 1902 रोजी शहजादपूर गावी, जे आत्ताच्या कौशांबी जिल्ह्यामध्ये आहे, झाला.
दुर्गा भाभींच्या क्रांतिकारी पक्षधरतेची आणि साहसाची खरी परीक्षा तेव्हा झाली जेव्हा सॉंडर्सच्या हत्याकांडानंतर भगतसिंहाला लाहोर मधून बाहेर पडायचे होते. पोलिस आणि गुप्तहेरांच्या जाळ्यातून भगतसिंहाला काढण्यासाठी दुर्गा भाभींनी आपला तीन वर्षाच्या मुलगा, शची, याला घेतले आणि स्वत: दुर्गावतीच्या नावाने ‘साहेबांच्या’ (भगतसिंहाच्या) पत्नीची भुमिका निभावली. भगवतीचरण वोहरांना समजत नव्हते की ह्या दुर्गावती कोण? जेव्हा दुर्गावतीच्या रूपामध्ये त्यांनी दुर्गाभाभींना पाहिले, तेव्हा त्यांनी त्यांचे कौतुक करत म्हटले की – आज तुझी ओळख झाली!
भगवतीचरण वोहरांच्या बॉंब विस्फोटामध्ये झालेल्या अकाली मृत्यूचा आघात दुर्गा भाभींनी ज्या प्रकारे सहन केला, ते प्रेरणादायी आहे. इथपर्यंत की भगवतीचरण वोहरांना शेवटी बघायलाही त्या जाऊ शकल्या नाहीत.
भगवतीचरण वोहरांच्या मृत्यूनंतरही त्या क्रांतिकारी कार्यांमध्ये सक्रीय़ राहिल्या. अनेकदा जेल मध्ये गेल्या आणि शेवटी त्यांना जिल्हाबंदी करण्यात आली. नौजवान भारत सभा दुर्गाभाभींना सलाम करत त्यांच्या आणि सर्व क्रांतिकारकांच्या स्वप्नातील न्यायपूर्ण समाज बनवण्याचा संकल्प करत आहे.
क्रांतिकारक दुर्गा भाभी अमर रहें!
