दि.१८/०८/२०१९ रोजी ‘नौजवान भारत सभा’ द्वारे साठेनगर, मानखुर्द (मुंबई) येथे ‘भारतीय स्वातंत्र्याचे ७२ वर्ष आणि कलम ३७० चा प्रवास…’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले

आज दि.१८/०८/२०१९ रोजी ‘नौजवान भारत सभा’ द्वारे साठेनगर, मानखुर्द (मुंबई) येथे ‘भारतीय स्वातंत्र्याचे ७२ वर्ष आणि कलम ३७० चा प्रवास…’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. दरम्यान ‘नौवजवान भारत सभा’ कडून अविनाश ने प्रास्ताविक करत असताना गेल्या ७२ वर्षांमध्ये स्वातंत्र्यानंतर देशाची परिस्थिती व आजच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक संदर्भामध्ये म्हणणे मांडत असताना. आज सुद्धा बेरोजगारी, शिक्षणाचा अभाव, उपासमार, वाढती सांप्रदायिकता, कामगार कपात व ऑटोमोबाईल सेक्टर पासून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वाढत असलेली मंदी व डबघाईस आलेली देशाची परिस्थिती असे असताना बीजेपी सरकारने ‘माहितीचा अधिकार’ (आरटीआय) संपवणे, यूएपीए सारखे अन्यायकारी कायदे सक्तीने लागू करणे व कश्मीर मधील कलम ३७० व ३५ अ यासारख्या कलमांना हुकूमशाही पद्धतीने तिलांजली देत जम्मू-काश्मीरच्या जनतेवर जे दमनयंत्र लादली आहे. ते कोणत्याही संवेदनशील माणसाला अंतर्मुख केल्याशिवाय राहणार नाही. अशी आपली भूमिका मांडली.
दुसरीकडे भाडोत्री मीडियाद्वारे कश्मीर मध्ये सर्वकाही सामान्य आहे. आणि जे चालले आहे ते जनतेच्या किती हिताचे आहे. हे पटवून देण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात आटापिटा केला जात आहे. तर कश्मीर मधील जनता जीव मुठीत धरून प्राणपणाने आपल्या स्वाभिमानाने जगण्याच्या व आत्म निर्णयाच्या अधिकारासाठी संघर्ष करत आहे. या विषयावर बोलत चर्चेला सुरुवात करण्यात आली. पुढे चर्चेमध्ये अनेक प्रश्न उपस्थित झाले. जसे की, जम्मू-काश्मीरमध्ये ३७० व ३५ अ हे कलम कशासाठी तयार झाले? याने कश्मीर ला कोणते विशेषाधिकार दिले होते? कश्मीरमधील फुटीरतावादी राजकारण, कश्मीर मध्ये आरएसएसने पसरवलेले सांप्रदायिक विष व त्या ठिकाणची आज घडीला असलेली परिस्थिती. अशा अनेक प्रश्नावर गंभीरतेने चर्चा करण्यात आली.
स्थानिक तरुणांमध्ये या विषयाला घेऊन मोठ्या प्रमाणात गैरसमज होते. त्यासंदर्भात विचारणा केल्यास कळाले की, जी प्रसार माध्यम त्यांच्यापर्यंत पोहोचतात ते असेच सांगत असतात. अशी उत्तरे समोर आली. पुढे कश्मीरी जनतेच्या दमना विरोधात आवाज उठवत खरी परिस्थिती लोकांपर्यंत घेऊन जाणे गरजेचे आहे. आज कश्मीर तर उद्या कोणीही असू शकते त्यामुळे सांप्रदायिक हिंदुत्ववादी फासिस्ट बीजेपीच्या विरोधात लढल्या जाणाऱ्या या संघर्षाला देशभर वाचा फोडत कश्मीरी लोकांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहणे आपली जबाबदारी असल्याचे अधोरेखित करत. येणाऱ्या काही दिवसात पत्रके काढून लोकांपर्यंत यासंदर्भात योग्य कामगार कष्टकरी वर्गीय भूमिका घेऊन जाण्याचे ठरवण्यात आले.

Related posts

Leave a Comment

fifteen + 3 =