गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यांत आलेल्या पुरामुळे आंबिलओढ्यालगतची भिंत फुटून ओढ्यालगत राहणाऱ्या हजारो नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. येत्या काळात भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार कधीही अतिवृष्टी होऊ शकते आणि पूर येऊ शकतो म्हणून सर्व्हे नं 133, 134, 214 दांडेकर पूल भागात नौजवान भारत सभेच्या कार्यकर्त्यांनी पूर्वपरिस्थितीपासून बचाव होण्यासाठी कोणती कामे बाकी आहेत याची घरोघरी जाऊन चर्चा केली. चर्चेदरमान्य नागरिकांचा प्रशासनाबद्दल प्रचंड राग दिसून आला. एक वर्ष पूर्ण झाले तरी प्रशासनाने आंबीलओढ्या लगतच्या भिंतीचे काम पूर्ण केलेले नाही. वस्त्यामधील नाल्यांचे आणि चेंबर्सचे काम सुद्धा पूर्ण झालेली नाही. भीतीदायक वातावरणात येथील कामगार कष्टकऱ्यांना राहावे लागत आहे. तरीही प्रशासन या कामांकडे दुर्लक्ष करत आहे. नागरिकांनी यासंदर्भात प्रशासनाला जाब विचारून दबाव टाकून सर्व अर्धवट कामे पूर्ण करवून घेण्याचा निर्धार केला. दि 22 सप्टेंबर रोजी नौजवान भारत सभा व आंबीलओढा पूरग्रस्त नागरिक संघर्ष समितीच्या वतीने आंबीलओढ्यालगतच्या भिंतीचे काम पूर्णत्वास न्यावे आणि सदर वस्त्यांमधील नाल्यांचे आणि चेंबर्सच्या दुरुस्तीचे आणि स्वच्छतेचे काम येत्या दोन दिवसात करून द्यावे ह्या मागण्या घेऊन पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना दि. २२ सप्टेंबर २०२० रोजी निवेदन देण्यात आले.
नौजवान भारत सभा व आंबीलओढा पूरग्रस्त नागरिक संघर्ष समितीच्या वतीने आंबीलओढ्यालगतच्या भिंतीचे काम पूर्णत्वास न्यावे आणि सदर वस्त्यांमधील नाल्यांचे आणि चेंबर्सच्या दुरुस्तीचे आणि स्वच्छतेचे काम येत्या दोन दिवसात करून द्यावे ह्या मागण्या घेऊन पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना दि. २२ सप्टेंबर २०२० रोजी निवेदन देण्यात आले
