शहीद भगतसिंह स्मृती संकल्प अभियान अंतर्गत नौभास सदस्यता आव्हान आणि पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन

दि. २६/०९/२०२० रोजी सायं. गौतमनगर, (गोवंडी, मुंबई) येथे नौभास कडून सदस्यता अभियान चालवण्यात आले.
समाजात दुही माजवण्यासाठी सांप्रदायिक शक्ती जाती धर्माच्या नावाने विष पेरून तरुण पिढ्यांना पोखरून बर्बाद करण्याचे काम मीडिया आणि सांप्रदायिक संघ परिवार करत आहे. अशा काळात तरुणांना शिक्षण, रोजगार, आरोग्य, अशा अनेक प्रगतिशील सामाजिक व राजकीय मुद्द्यावर संघटित करून निर्णायक लढा उभा करण्याचा प्रामाणिक प्रयत्नाचा आणि क्रांतिकारी वारशाच्या अभियानाचा एक भाग म्हणून सदस्यता अभियान चालविण्यात येत आहे.
यामध्ये पुस्तके हे सर्वात महत्त्वाची आणि मानव निर्मित समस्त चमत्काराचा भाग म्हणून नेहमीच महत्त्वाची भूमिका निभावत असतात म्हणून जागोजागी पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहेत. याच कडीतील एक भाग म्हणून खाडी, साठेनगर ( मानखुर्द) मध्ये पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. वाचन संस्कृतीला चालना ही आपल्या महान क्रांतिकारकांच्या अमूल्य बलिदानाच्या प्रेरणेतून पुस्तकरूपाने समजून घेण्यासाठी वाचन हा एक महत्वपूर्ण कार्यक्रम आहे.
ज्याप्रमाणे भगतसिंहाने म्हटने होते की, दुर्भाग्याने भारतीय क्रांतीचा पक्ष हा नेहमीच कमकुवत राहिला आहे. त्यामुळे तरुणांनी वाचन, चिंतन, मनन या कार्याला आपले महत्वपूर्ण जबाबदारीचे काम बनवले पाहिजे.
या सजग जाणिवेतून नौभसकडून पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे.
अपील :-
शहीद भगतसिंग यांच्या 113 व्या जयंती निमित्त 27, 28 सप्टेंबर रोजी जनसहयोगाच्या बळावर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. मुंबई, (मानखुर्द, गोवंडी) मधील या आयोजनात आपण सुद्धा सहभागी व्हावे. त्यासाठी खालील मोबाईल नं वर संपर्क करा. जे या कार्यक्रमासाठी आर्थिक योगदान देवू इच्छितात अशांनी नौभास सदस्य डॉ.पूजा यांच्या खात्यावर आर्थिक सहयोग करावे.
POOJA VIJAY CHINCHOLE
Ac/no – 0925010406826
Bank :- United Bank of India ( Deccan Gymkhana)
IFSC – 0TBI0DEC632
Google pay – 7588733724
आमचे संपर्क –
डॉ. पूजा7588733724
अविनाश – 8826265960

Related posts

Leave a Comment

19 − seven =