शिक्षण सहायता मंडळाची सुरुवात – अहमदनगर

नौजवान भारत सभा (अहमदनगर) युनिटच्या वतीने गेल्या मागील चार वर्षापासून शिक्षण सहायता मंडळ चालवण्यात येत आहे. उन्हाळी सुट्टी नंतर पुन्हा नवीन शैक्षणिक वर्षांमध्ये शिक्षण सहायता मंडळाची सुरुवात करण्यात आली आहे.
आज देशात शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे बहुसंख्य कामगार कष्टकरी वर्गातून येणाऱ्या मुलांना शिक्षण घेणे अवघड झाले आहे. शाळांच्या वाढत्या फी, महागडे कोचिंग क्लासेस मुळे विद्यार्थी शिक्षण व्यवस्थेतून बाहेर फेकले जात आहेत अशा परिस्थितीत फक्त 24 टक्के विद्यार्थीच उच्च शिक्षणापर्यंत पोहोचतात.
“नौजवान भारत सभेच्या” वतीने देशाच्या विविध भागातील कामगार वस्त्यांमध्ये शिक्षण सहायता केंद्र चालवले जाते. यामध्ये विद्यार्थ्यांना फक्त परिक्षेपुरतं शिकवणे हा उद्देश नसून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवणे, चिकित्सक वृत्ती निर्माण करणे तसेच देशातील सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रश्नांबद्दल जागृत करणे व शिक्षणाबद्दल गोडी निर्माण करणे ही उद्दिष्टे आहेत.
सिद्धार्थनगर मधील शिक्षण सहायता केंद्रामध्ये इयत्ता 5 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना मराठी, इंग्रजी, विज्ञान, गणित हे विषय शिकवले जातात. विद्यार्थ्यांकडून ‘शिक्षण सहायता केंद्राला’ भरभरून प्रतिसाद मिळत आहे. शिक्षण सहायता केंद्रामध्ये शिकणारी मुले-मुली ही कामगार कष्टकरी वर्गातून येणारी आहेत. सरकारी शाळांची परिस्थिती अतिशय बिकट असून कोरोना महामारीमुळे जवळपास 2-3 वर्ष शाळा बंद असल्यामूळे कामगार कष्टकरी वर्गातून येणाऱ्या विद्यार्थांचे प्रचंड नुकसान झाले. अशा परिस्थितीत शिक्षण आणि रोजगाराच्या हक्काचा लढा उभारत असतानाच नौजवान भारत सभा शिक्षण सहायता केंद्राद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शिक्षण सहायता मंडळ हा उपक्रम चालवत आहे.
नौजवान भारत सभा (अहमदनगर)
संपर्क – 7249590541,9403317106

Related posts

Leave a Comment

five × two =