या मार्फत त्यांमध्ये शिस्त, लोकशाही प्रगतीशील मूल्ये आणि सामुहिकता रुजविण्याचे काम चालू आहे.
परंतु हे स्पोर्ट्स क्लब फक्त क्रीडाकलापांपुरते मर्यादित नसून एक व्यापक क्रांतिकारी ध्येय डोळ्यासमोर ठेऊन चालविल्या जात आहे. आजरोजी फॅशिस्टांच्या मांडीवर बसलेल्या भांडवली मीडिया, प्रसारमाध्यमे, तसेच माहितीवर्धनाची आणि मनोरंजनाची सर्व दृकश्राव्य माध्यमे यांतर्फे जनतेवर भांडवली संस्कृतीचा व राजकारणाचा सतत मारा होत आहे आणि जनतेमध्ये जातीधर्माचे विष पेरण्याचे काम होत आहे. तेव्हा या राजकारणाला हाणून पाडणे आणि जनतेमध्ये प्रगतीशील दृकश्राव्याचा प्रसार करणे अत्यंत महत्त्वाचे होऊन बसले आहे.
म्हणून ह्या स्पोर्ट्स क्लब मध्ये खेळांसोबतच क्रांतिकारकांचा वारसा पुढे घेऊन जाण्याच्या उद्दिष्टाने त्यांच्या जयंती व शहीद दिनी कार्यक्रम, चित्रपट प्रदर्शन, पुस्तक वाचन इत्यादी आयोजित केले जाते. याचाच एक भाग म्हणून रविवारी 27 एप्रिल रोजी शहीद भगतसिंह वाचनालय, सुप्पर येथे “आत्मपॅम्फ्लेट” ह्या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. चित्रपट संपल्यावर मुलांनी तो कसा वाटला तसेच त्यातून काय शिकायला मिळाले यांवर चर्चा केली. मनोरंजक असण्यासोबतच हा चित्रपट जाती, धर्म, प्रांत इत्यादी भेदांची टीका करतो. सलोख्याने आणि एकजुटीने मैत्रीपूर्वक राहणे, उच्चनीचता, जातपात, धर्मभेद न पाळणे, इत्यादी मूल्ये दर्शवतो.
