पुण्यातील अप्पर बिबवेवाडी भागात शहीद भगतसिंग वाचनालयामध्ये नौजवान भारत सभेकडून शिक्षण सहायता केंद्र चालवले जाते

पुण्यातील अप्पर बिबवेवाडी भागात शहीद भगतसिंग वाचनालयामध्ये नौजवान भारत सभेकडून शिक्षण सहायता केंद्र चालवले जाते. यामध्ये नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना गणित हा विषय शिकवला जातो. शिक्षण सहायता केंद्रामध्ये शिकणारी मुले-मुली ही कामगार कष्टकरी वर्गातून येणारी आहेत. शिक्षणाचे मोठ्या प्रमाणावर खाजगीकरण झाल्यामुळे कामगार कष्टकरी वर्गातून आलेल्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळत नाही. घरातील परिस्थिती हलाखीची असल्यामुळे खाजगी शाळेत पैसे भरून शिक्षण घेणे अवघड आहे व सरकारी शाळांची परिस्थिती अतिशय बिकट असून कोरोना महामारीमुळे जवळपास 2-3 वर्ष शाळा बंद असल्यामूळे कामगार कष्टकरी वर्गातून येणाऱ्या विद्यार्थांचे प्रचंड नुकसान झाले.अशा परिस्थितीत शिक्षण आणि रोजगाराच्या हक्काचा लढा उभारत असतानाच नौजवान भारत सभा शिक्षण सहायता केंद्राद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला माहितीच आहे की नौजवान भारत सभा ही कामगार कष्टकऱ्यांच्या आर्थिक सहयोगावरच चालते.त्यासाठी आज आपल्या मदतीची गरज आहे. आम्ही सर्व न्यायप्रिय जनतेला सहयोग करण्याचे आवाहन करत आहोत.
आपण पुढील प्रकारे वाचनालयासाठी सहयोग देऊ शकता.
1. आर्थिक सहयोगासाठी तपशील
Susmit Rao
State Bank Of India, Shahanoorwadi branch
Acc/no: 62196144356
IFSC: SBIN0021139
GPay/PhonePe: 8605246087
संपर्क
सुस्मित-8329869421
नेहा – 7769858775

Related posts

Leave a Comment

twelve + 4 =