दिनांक 20/9/22 रोजी शहीद भगतसिंह स्मृती संकल्प अभियानाअंतर्गत शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्राच्या विद्यार्थ्यांसाठी “द लेजेंड ऑफ़ भगत सिंह” ह्या चित्रपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले

स्क्रिनिंग नंतर चित्रपटातील काही स्मरणीय दृष्यांबद्दल चर्चा करतांना 9 वीत शिकणाऱ्या चंद्रू ने मांडले की त्याला चित्रपट खूप आवडला. आशय ने मांडले की भगतसिंहांचे विचार आजही आपल्यामध्ये जिवंत आहेत. गीताने मांडले की तिला सुखदेवचे पात्र खूप भावले. शाईस्ता ने मांडले की भगतसिंह व त्यांच्या साथीदारांवर खटला सुरू असताना गांधींनी घेतलेल्या भूमिकेवर तिला राग आला, भगतसिंहाला फाशी देण्याच्या न्यायालयाच्या निर्णयानंतर गांधींना गांधी इरविन पैक्ट वर हस्ताक्षर करण्याची काहीही गरज नव्हती. शाहीन ने सांगितले की तिने हा चित्रपट अनेक वेळा बघितला असला तरी प्रत्येक वेळी भगतसिंह आणि त्यांच्या साथीदारांच्या त्यागाबदल विचार केला की डोळ्यात पाणी येते. असिफला आवडले की चित्रपटातील एका गाण्यात भगतसिंह शेतकऱ्यांना इंग्रजांचे गुलाम न बनण्यास व स्वतःच्या स्वाभिमानासोबत तडजोड न करण्यास सांगतात. पुढे असिफ जोडतो की आजच्या कामगार – कष्टकऱ्यांच्या जीवन स्थितीत फार फरक पडलेला दिसून येत नाही.चर्चेत हे सुद्धा बोलणे झाले की शाळेतील आणि महाविद्यालयीन पुस्तकांमध्ये भगतसिंहाचे दैवीकरण देखील केले आहे आहे ज्यात त्यांच्या विचारांना लपवून ठेवत त्यांना ‘एक बंदूक, बॉम्ब यांच्या सहाय्याने स्वातंत्र्य मिळवू पाहणारा, काहीही विचार न करता भावविवश होऊन फासावर चढणारा एक गरम रक्ताचा युवक’ म्हणून आपल्या समोर प्रस्तुत केले जाते. परंतु भगतसिंहांबद्दल, त्यांनी लिहिलेले साहित्य सविस्तरपणे वाचल्यानंतर हे कळून येते की भगतसिंह कुणी दिव्य आकृती वगैरे नव्हते तर आपल्या प्रमाणेच एक सामान्य व्यक्ती होते जे गोष्टींचा गांभीर्याने विचार करत असत, समजून घेत असत व अन्यायाविरोधात लढणे आपले कर्तव्य मानत असत. त्यांचे स्वप्न होते की समाज प्रत्येक प्रकारच्या शोषण आणि अत्याचारापासून मुक्त असायला हवा, जिथे प्रत्येक व्यक्ती स्वाभिमानाने जगू शकेल. जर आपल्याला शहीद भगतसिंहांच्या स्वप्नपूर्तीसाठी काम करायचे असेल तर आपल्याला देखील प्रत्येक प्रकारच्या अन्याय आणि अत्याचाराविरोधात आवाज उठवत, जाती धर्माच्या नावावर लोकांना विभागणाऱ्या राजकारणाचा विरोध करत सामान्य कष्टकरी जनतेला एकजूट करावे लागेल आणि एका समतामूलक समाजाच्या निर्माणकरता पुढे पाऊल टाकावे लागेल.
कार्यक्रमात अरफात, आसिफ, अमन, चंद्रू, वेट्रिवेल, विजय, जयप्रकाश, गीता, अर्जुन, जोया, गुलशन, रेशमा, ईशा, उषा, शाइस्ता, शाहीन, राबिया, तनिषा, शशांक, राहुल, आशय आणि सुप्रीत सामील झाले होते.
भगतसिंह जन्मदिवसानिमित्त नौजवान भारत सभेतर्फे आयोजित वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्र, अभियानांमध्ये सामील होण्यासाठी संपर्क करा :-
अविनाश – 8826265960
शशांक – 7667230795

Related posts

Leave a Comment

two − 2 =