शहीद स्मृत्ती संकल्प अभियान – अहमदनगर

शहीद स्मृत्ती संकल्प अभियानाअंतर्गत नौजवान भारत सभा अहमदनगरच्या वतीने सर्जेपुरा भागात बेरोजगारी या विषयाला घेऊन “राजाचा वाजला बाजा” हे पथनाट्य सादर करण्यात आले. आज देशामध्ये भयंकर मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत आहे. महागाई ने तर सर्व-सामान्य जनतेचे कंबरडेच मोडले आहे. शिक्षण दिवसेंदिवस महाग होत आहे. अश्या सर्व परिस्थितीमध्ये परत एकदा आपल्याला भगतसिंहाच्या विचारांना उजाळा देत त्यांनी ज्या सामाजाच्या स्थापनेचे स्वप्न पाहिले होते जिथे एका माणसापासून पासून दुसऱ्या माणसाचे शोषण होणार नाही, त्यापासून आज आपण प्रेरणा घेऊन एकत्र येऊन संघर्ष करण्याची गरज आहे हे सांगून अभियानात सहभागी होण्याचे आवाहन नौजवान भारत सभेच्या वतीने जनतेला करण्यात आले. हे अभियान अहमदनगर शहरातील विविध भागात राबवण्यात येणार आहे.

Related posts

Leave a Comment

fourteen − 3 =