नौजवान भारत सभा कडून गेले काही आठवडे पुण्याच्या विविध भागांमध्ये सदस्यता अभियान राबवले जात आहे.

या अभियानादरम्यान देशाची राजकीय, सामाजिक, आर्थिक स्थिती मांडणारे “देशाला पुढे न्या” या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात येत आहे तसेच क्रांतिकारकांचे विचार तरूणांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुस्तकांचे प्रदर्शन लावण्यात येत आहे तसेच नौजवान भारत सभा आज तरूणांमध्ये का काम करते या संदर्भात तरूणांशी संवाद साधला जात आहे.
स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतरही आजही क्रांतिकारकांचे विचार प्रासंगिक आहेत. शहीद भगतसिंह यांनी म्हटले होते की गोरा इंग्रज जाईल आणि काळा इंग्रज येईल. शहीद भगतसिंह यांचे विचार आजही तंतोतंत खरे ठरले आहेत. एकीकडे आजही देशातला कामगार कष्टकरी वर्गातून येणारा तरुण महागडे शिक्षण, बेरोजगारी, महागाई, भविष्याबद्दल निराशा त्यातून आत्महत्यांचे वाढलेले प्रमाण या सारख्या समस्यांना सामोरे जात आहे. तर दुसरीकडे आज तरुणांना धार्मिक, जातीय उन्मादात भडकवण्याचे काम फॅशिस्ट सत्तेकडून करण्यात येत आहे. आपल्या जीवनातील समस्यांना आपण स्वत: नालायक असल्यामुळे जबाबदार आहोत किंवा लोकसंख्या जबाबदार आहे किंवा परप्रांतीय जबाबदार आहेत असे नाना प्रकारचे भ्रम तरूणांमध्ये पसरवण्यात येत आहेत. आज सर्व तरुणांनी समजून घेतले पाहिजे की आपल्या आयुष्यातील प्रश्नांना ही नफेखोर व्यवस्था जबाबदार आहे. म्हणूनच सर्व तरुणांनी आज शिक्षणाचा अधिकार तसेच रोजगाराचा अधिकार या मूलभूत प्रशांसाठी एकत्र आले पाहिजे.
तरुणांनी आज त्यांचे नेमके प्रश्न काय हे समजून घेऊन त्यांच्या मुळाशी गेले पाहिजे. फक्त प्रश्न समजून घेणे पुरेसे नाहीये तर प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र आले पाहिजे. याच साठी पथनाट्याच्या माध्यमातून, पुस्तक प्रदर्शनाच्या माध्यमातून तरूणांसोबत अशा प्रकारचा संवाद केला जात आहे. याच सोबत विविध सामाजिक, राजकीय मुदद्यांवर चर्चासत्र आयोजित करणे, जगभरातील दर्जेदार चित्रपट बघून चर्चा यांसारखे अनेक कार्यक्रम दर आठवड्याला आयोजित केले जातात. तुम्हीसुद्धा अशा कार्यक्रमांमध्ये सामील होऊ शकतात.
सामील होण्यासाठी संपर्क रवी: 8956840785

Related posts

Leave a Comment

14 + three =