कुस्ती पहिलवानांचे गेले 35 दिवस शांततापूर्ण मार्गाने सुरू असलेले आंदोलन काल दिल्ली पोलिसांनी अत्यंत अमानवीय रीतीने मोडून काढले. भाजप सरकारचा मंत्री ब्रुजभूषण यांच्यावर महिला कुस्ती पहिलवानांचे लैंगिक शोषण करण्याचा आरोप आहे. त्यांच्या अटकेची मागणी करणाऱ्या कुस्ती खेळाडूंना भर रस्त्यात फरफटत, जबरदस्तीने पकडुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्या आंदोलनाची जागा उध्वस्त करून साऱ्या समर्थनकर्त्यांना दिल्ली पोलिसांनी हुसकावून लावले आणि आंदोलनं संपवण्याचा प्रयत्न केला.
ही सारी घटना तेव्हा घडली जेव्हा भाजप सरकार नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यात मग्न होते. संसंद भवनाला लोकशाहीचे मंदिर म्हणत कुस्ती पहिलवानांच्या लोकशाही अधिकाराचे हनन करणाऱ्या भाजप सरकारच्या विरोधात मानखुर्द–गोवंडी येथे नौजावन भारत सभा, स्त्री मुक्ती लीग, दिशा विद्यार्थी संघटना वतीने निदर्शने करण्यात आले.
