आंदोलनरत कुस्ती पहिलवानांवर झालेल्या पोलिसी दमना विरोधात दादर (मुंबई) मध्ये निदर्शने

आंदोलनरत कुस्ती पहिलवानांवर झालेल्या पोलिसी दमना विरोधात दादर (मुंबई) मध्ये निदर्शने

29 मे ला मानखुर्द-गोवंडी मधिल निदर्शनानंतर काल 30 मे ला दादर रेल्वे स्थानकासमोर कुस्ती पहिलवानांच्या पोलिसी दमणा विरोधात निदर्शने करण्यात आली.

मागील दीड महिन्यापासून शांततापूर्ण मार्गाने सुरु असलेल्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांद्वारे 28 मे रोजी अमानवीय पद्धतींनी मोडून काढण्यात आले. या घटनेचा विरोध म्हणून दादर येथे निदर्शने आयोजित करण्यात आली होती. यात स्त्री मुक्ती लीग, नौजवान भारत सभा, आणि दिशा विद्यार्थी संघटना व अन्य प्रगतिशील संघटनांनी सहभाग घेतला होता.

भाजपच्या गुंड खासदार ब्रुजभूषण सिंह याच्या विरोधात महिला कुस्ती पहिलवानांनी लैंगिक शोषण करण्याचा आरोप केला आहे. ज्यात एका नाबालिक मुलीचा देखील लैंगिक शोषण करण्याचा आरोप ब्रुजभूषण वर आहे. त्याच्या अटकेची मागणी करणाऱ्या कुस्ती खेळाडूंना भर रस्त्यात फरफटत, जबरदस्तीने पकडून त्यांच्यावर खोटे गुन्हे दिल्ली पोलिसांनी दाखल केले आहेत. जंतर मंतर येथे त्यांच्या आंदोलनाची जागा सुद्धा उद्ध्वस्त करून टाकत समर्थकांना दिल्ली पोलिसांनी हुसकावून लावले आणि आंदोलन संपवण्याचा प्रयत्न केला.

कुश्ती खेळाडूंनी सरकारला पुढील पाच दिवसात ब्रुजभूषण सिंह यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. नाहीतर त्यांनी देशाकरता जिंकलेले आंतरराष्ट्रीय स्पर्धांनामध्ये मेडल्स गंगा मध्ये विसर्जित करण्याच्या आणि आमरण उपोषणावर बसण्याचा इशारा दिला आहे.

निदर्शनादरम्यान वक्त्यांनी आपल्या भाषणामध्ये भाजप सरकारचे स्त्री विरोधी चरीत्र जनतेसमोर उघड केले. देश भरात भाजपचे 100 मंत्री असे आहेत ज्यांच्या विरुद्ध स्त्री विरोधी गुन्हे दाखल आहेत तर त्यात 20 मंत्री असे आहेत ज्यांच्या विरुद्ध बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत. तसेच ब्रुजभूषण सिंह यांचा खरा गुंड चेहरा सुद्धा जनतेसमोर उघडा केला गेला. या ब्रुजभूषण सिंहच्या विरुद्ध 40 गुन्हे दाखल आहेत. ज्यात खून, दंगली भडकवणे, इत्यादी सारखे गंभीर गुन्हे सुद्धा आहेत. निदर्शनादरम्यान जनतेला कुस्ती पहीलवानांच्या लढ्यात सामील होण्याचे आव्हान केले गेले तसेच शेकडोच्या संख्येत पत्रक वाटण्यात आले.

Related posts

Leave a Comment

nineteen + one =