
केंद्रीय आणि राज्यस्तरीय परीक्षांमध्ये पेपरफुटी व भरतीमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराविरोधात देशव्यापी अभियानाचा भाग म्हणून दिशा विद्यार्थी संघटना आणि नौजवान भारत सभेच्या वतीने अहमदनगर मधील स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी, अभ्यास केंद्र यात अभियान चालविण्यात आले.
अभियाना दरम्यान पत्रक वितरण करण्यात आले तसेच 9ऑगस्ट रोजी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे होत असलेल्या आंदोलनाबद्दल माहिती देण्यात आली. या आंदोलनात देशभरातून विद्यार्थी–युवक एकजूट होऊन परीक्षेमध्ये पारदर्शिता आणि रोजगाराच्या अधिकारासाठी एकजूट होणार आहेत.
या अभियानांतर्गत आंदोलनाच्या समर्थनात स्वाक्षरी मोहीम चालवली जा त आहे. तसेच विद्यार्थी-युवक यांना 9 ऑगस्ट रोजी दिल्लीमध्ये होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन ही करण्यात आले. विद्यार्थीही उत्स्फूर्तपणे या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत आहेत व सहयोग ही करत आहेत.
आमच्या मागण्या:
1. एन.टी.ए.ला तत्काळ रद्द करुन परीक्षा आयोजनाची प्रभावी आणि भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था विकसित केली जावी.
2. राज्यांत भरती आयोजित करणाऱ्या संस्थांच्या कार्यप्रणाली त्वरित दोषमुक्त करण्यात याव्यात !
3. वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, इत्यादी क्षेत्रांतील पदांना तत्काळ दहापटीने वाढवण्यात यावे.
4. पेपरफुटी आणि भरती यांमध्ये भ्रष्टाचारासाठी दोषी असलेल्या व्यक्ती, अधिकारी, नेतेमंडळी यांच्यावर कठोर कलमं लावून गुन्हे दाखल करून त्यांना कठोरतम शिक्षा करण्यात यावी.
5. प्रश्नपत्रकांची छपाई खाजगी छापखान्यांमधून न करता सरकारी छपाईखान्यांमधून केली जावी.
6. परिक्षांमध्ये झालेल्या घोटाळ्यांमुळे प्रभावीत झालेल्या विद्यार्थ्यांच्या नुकसानीचे मूल्यांकन करून त्यांना योग्य ती भरपाई देण्यात यावी.
7. केंद्र आणि राज्य विभागांतील रिक्त पदांना तत्काळ आणि ठराविक कालमर्यादेत भरण्यात यावे.
8. कंत्राटीकरण आणि जुजबीकरणावर रोख लावून सर्व कर्मचाऱ्यांना पक्के केले जावे.
9. सर्वांसाठी समान तसेच निःशुल्क शिक्षण आणि सर्वांसाठी रोजगाराची सोय करण्यात यावी.
10. ‘भगतसिंह राष्ट्रीय रोजगार हमी कायदा’ पारित करण्यात यावा.
11. घटनादुरुस्ती करून शिक्षण-रोजगार-आरोग्य-निवासाला मूलभूत अधिकार बनवण्यात यावा.
दिशा विद्यार्थी संघटना, नौजवान भारत सभा
संपर्क: 7249690541, 9403317106
