शहिद राजगुरू यांच्या जन्मदिवसानिमित्त चर्चासत्राचे आयोजन

 

 

 

 

 

 

 

दि. 24 ऑगस्ट रोजी शहिद राजगुरू यांच्या जन्मदिनानिमित्त नौभास अहमदनगर च्या वतीने ‘शहिद राजगुरू यांचे जीवनकार्य व आजच्या काळात त्यांच्या विचारांची प्रसंगीकता’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. चर्चासत्राच्या कार्यक्रमाची सुरुवात शहिद राजगुरू यांच्या प्रतिमेला अभिवादन करत तसेच ‘मेरा रंग दे बसंती चोला’ ह्या क्रांतिकारी गीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साथी अतुल यांनी केले. तर साथी अविनाश यांनी शिवराम हरि राजगुरू यांचा क्रांतिकारी चळवळीतील जीवनपट मांडला.

शहिद भगतसिंग, शहिद राजगुरू, शहिद सुखदेव हे तरुण वयातच एका सुंदर समाजाच स्वप्नं पाहत हसत हसत फासावर गेले. राजगुरू व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे स्वप्न होते की, अशी समाजव्यवस्था निर्माण झाली पाहिजे. जिथे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीचे शोषण होणार नाही, जिथे नफ्यावर आधारित उत्पादन व्यवस्था नसून मानवकेंद्री व्यवस्था असेल. त्यांचे जे स्वप्न आज देशाच्या 77 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतरही अधुरे राहिले दिसत आहे. ते पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या देशातील तरुणांवर आहे. या तरुणांपर्यंत विचार पोहचू नये यासाठी स्वातंत्र्योत्तर सर्वपक्षीय सरकारांनी सुरुवातीपासूनच क्रांतिकारी विचारांचा वसा आणि वारसा शालेय पाठ्यपुस्तकातून हद्दपार केला आहे. तसेच क्रांतिकारकांचा खरा इतिहास लपवणे, विकृत करणे आणि दडपण्याचा काम केले आहे. या बाबींना सामोरे ठेवून चर्चा सत्रात मांडणी करण्यात आली.

आज घडीला शिक्षणाचे झालेले बाजारीकरण, सरकारी शाळांमधील शिक्षणाचा घसरणारा दर्जा या बाबींचा सर्वात जास्त फटका हा कष्टकरी सामान्य जनतेला बसत आहे. कारण खाजगी शाळांची फिस कामगार कष्टकरी जनतेच्या अवाक्या बाहेर असते. कामगार कष्टकरी वर्गातून येणारे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. अभ्यासक्रम बदलून स्वातंत्र्य चळवळीचा खोटा इतिहास हा येणाऱ्या नवीन पिढीला शिकवण्याची जोरदार प्रयत्न चालवले जात आहेत.

चर्चा सत्रातील मांडणीनंतर सत्र चर्चे साठी खुले करण्यात आले. उपस्थित सर्वांनी खुप चांगल्या प्रकारे चर्चेत भाग घेतला. त्यानंतर कार्यक्रमाचा शेवट ‘दोस्तीचा घेऊन हात’ ‘आ रे नौजवान’ या क्रांतिकारी गीतांनी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या शेवटी शहिद राजगुरू अमर रहे! इंकलाब जिंदाबाद! फासिवाद मुर्दाबाद! साम्राज्यवाद मुर्दाबाद! या घोषणा देण्यात आल्या.

नौजवान भारत सभा (अहमदनगर)
संपर्क – 7249590541

Related posts

Leave a Comment

fourteen − one =