“मुंबई, असे शहर जे कधीही झोपत नाही.” अशीच काहीशी ओळख आहे या शहराची आणि मुंबईत पोहोचलेल्या भगतसिंग जनअधिकार यात्रेतील यात्रेकरूंना असेच वाटले. कोणताही आजार, थकवा आणि निराशा ही भगतसिंग जन अधिकार यात्रेच्या क्रांतिकारी हिमतीला मोडू शकली नाही. दररोज सरासरी 15 किलोमीटर चालल्यानंतर, यात्रेकरू शहीद भगतसिंग आणि एक चांगले जग निर्माण करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या इतर क्रांतिकारकांकडून मिळालेली मशाल पुढे नेण्याच्या नव्या संकल्पाने दररोज जागे होतात. मागील आठवड्यात मानखुर्द, गोवंडी, दादर, ठाणे मार्गे यात्रा काढली गेली. ही यात्रा जिकडे जाईल तिचे आपली एक विशिष्ट छाप सोडत आहे. याआधी एवढ्या मोठ्या प्रमाणावर देशव्यापी मोर्चा कधीच काढण्यात आला नव्हता आणि तेही संपूर्णपणे जनतेच्या सहयोगातून. कामगार नाक्यावर कामाच्या शोधात थांबणारे रोजंदारी कामगार, खांद्यावर बांगड्यांचा भारी बोजा घेऊन जाणारे बांगड्या विक्रेते, रिक्षावाले, घराघरांत राबणारे घरकामगार असे अनेक कामगार कष्टकरी लोक आहेत जी आपल्या कष्टाच्या पैशातून या यात्रेला उदारपणे हातभार लावत आहेत. मुंबईच्या कडक उन्हात यात्रेकरूंना थोडा वेळ विश्रांती घेण्याचा आग्रह करत अनेकजण आपले काम थांबवून उत्साहाने यात्रेकरूंना चहा देण्यासाठी पुढे सरसावत होते. आम्ही सर्वांना आव्हान करतो की बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, जातीयवाद आणि सर्वसामान्य जनतेची लूट यांविरुद्धच्या या जनआंदोलनाला उभारी देण्यासाठी पुढे या, या तांड्यात सामील व्हा, यासाठी उदार हाताने योगदान द्या. भगतसिंग जन अधिकार यात्रेत सहभागी व्हा! #inflation #unemployment #communalism #corruption
भगतसिंग जन अधिकार यात्रा मुंबईमध्ये
