नौजवान भारत सभेतर्फे अनेक क्रांतिकारकांना त्यांच्या शब्दांनी प्रेरणा देणाऱ्या, आशेचे कवी (poet of hope) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिध्द टर्किश कवी नाझिम हिकमत यांच्या 122 व्या जन्मदिवशी त्यांना आठवत काव्यवाचन आणि चर्चा आयोजित केली होती

महान मानवता प्रवास करते
जहाजेच्या डेकवर
रेल्वेच्या थर्ड क्लास डब्ब्यांमध्ये
पक्क्या सडकेवर पायी
महान मानवता.
महान मानवता आठ वाजता कामावर जाते
विसाव्या वर्षी लग्न करते
चाळीशीपर्यंत मरून जाते
महान मानवता
पुरेशी भाकरी प्रत्येकासाठी असते महान मानवतेला सोडून
भातासोबतही तेच
साखरेसोबतही तेच
कपड्यांसोबतही तेच
पुस्तकांसोबतही तेच
पुरेश्या वस्तू असतात सर्वांसाठी महान मानवतेला वगळता.
महान मानवतेच्या अंगणात सावली नसते
तिच्या वाटेवर दिवे नसतात
तिच्या खिडकीला काचा नसतात
पण महान मानवतेकडे आशा असते
आशेविना तुम्ही जिवंत राहू शकत नाही!
– नाझिम हिकमत

नौजवान भारत सभेतर्फे अनेक क्रांतिकारकांना त्यांच्या शब्दांनी प्रेरणा देणाऱ्या, आशेचे कवी (poet of hope) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिध्द टर्किश कवी नाझिम हिकमत यांच्या 122 व्या जन्मदिवशी त्यांना आठवत काव्यवाचन आणि चर्चा आयोजित केली होती. ह्यात नाझिम हिकमत यांच्या जीवनप्रवासावर, त्यांच्या कविता वाचून त्यावर तसेच कलेचे समाजाप्रती असलेले कर्तव्य यांवर चर्चा केली. आपल्या आयुष्याचा एक मोठा काळ कारागृहात आणि निर्वासानात घालवल्यानंतर देखील त्यांच्या शब्दांनी त्यांनी जगभरातील अन्याय्य, विषमतापूर्ण समाजबदलण्याच्या संघर्षात सामील असलेल्या सर्वांना प्रेरित केले आणि आजही करतात! त्यांच्या साहित्यातील विद्रोही सुराला घाबरून तुर्कीच्या सरकारने त्यांच्या साहित्यावर अनेक वर्षे बंदी घातली.

सूक्ष्म मानवीय भावनांना सहज, हृदयाला भिडेल अशा शब्दांत चित्रित केलं. त्यांची कला पूर्णपणे हे जग घडवणाऱ्या आणि चालवणाऱ्या कष्टकरी लोकांना समर्पित होती. जगभरात चालणाऱ्या न्यायासाठी चालणाऱ्या, कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी लढल्या जाणाऱ्या संघर्षांना समर्पित होती. आपल्या शब्दाशब्दांतून त्यांनी मानवतेवर, जगभरातील कष्टकरी लोकांवर, लहान मुलांवर, प्रेम करण्यावर, संघर्षावर, आशेवर निरंतर प्रेम केलं. ह्या भांडवली गणतंत्रात सामान्य कष्टकर्याला बेरोजगार राहण्याचे स्वातंत्र्य देणारी स्वतंत्रता त्यांना दुःखद वाटली, वाटलं की कष्टकऱ्यांचे अतोनात कष्ट करणारे हात वगळता भांडवली जगातल्या ह्या व्यवस्थेने आपल्या हाती घेतलेल्या सर्व गोष्टी ह्या सत्य लपवतात, तुरुंगात राहूनही जिवंत राहणं आणि फक्त जिवंत राहणं नाही तर हसत जिवंत राहणं हे कसं प्रत्येक क्रांतिकारकाचं कर्तव्य आहे आणि त्यासाठी तुरुंगात मिळणाऱ्या भाकरीचा शेवटाचा तुकडाही खावा, त्या भिंतीपलिकडच्या जगासाठी! अशा लोकांसाठीसुद्धा लढावं ज्यांचे चेहरे सुद्धा तुम्ही कधी बघितले नसतील!
प्रिय कवी नाझिम यांना त्यांच्या जन्मदिवशी नौजवान भारत सभा अभिवादन करते आणि त्यांच्या स्वप्नांना, शब्दांना, कलेप्रती असणाऱ्या त्यांच्या दृशिकोनाला, त्यांच्या संघर्षाला जिवंत ठेवण्याचा आणि पुढे नेण्याचा संकल्प करते!
इंकलाब जिंदाबाद!

Related posts

Leave a Comment

one × two =