नौजवान भारत सभा, महाराष्ट्र राज्य कमिटीची मासिक मीटिंग आज दिनांक 22/01/2024 रोजी पार पडली.

 या मीटिंग मध्ये मागील महिन्यातील नौभासच्या कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला. कमिटीमधील सदस्यांनी येणाऱ्या दोन महिन्यात भगतसिंग जन अधिकार यात्रेचे प्रचार अभियान चालवण्यावर विशेष भर देण्याचे मान्य केले. तसेच नौभासची सदस्यता संख्या वाढवण्यासाठी युवकांच्या समस्यांवर आधारित ऑनलाईन चर्चासत्र चालवण्याचा ठराव मीटिंग मध्ये पारित केला गेला. महाराष्ट्रातील नौभासच्या कामांचा रिपोर्ट वेळेवर वेबसाईट आणि सोशल मीडियावर पोस्ट केला जावा यासाठी काही सदस्यांना विशेष जबाबदारी या मीटिंग मध्ये देण्यात आली. एकंदरीत महाराष्टातील नौभास चे काम अधिक गतीपूर्वक चालू करण्याचे नियोजन राज्य कमिटीने या मासिक मीटिंग मध्ये आखले आहे.

Related posts

Leave a Comment

eighteen − eleven =