नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे “सलीम लंगडे पे मत रो” चित्रपटाचे स्क्रिनिंग आणि चर्चा !!

 नौजवान भारत सभेतर्फे शहीद भगतसिंह वाचनालय, मानखुर्द, मुंबई येथे दिनांक 21 जानेवारी रोजी सईद अख्तर मिर्झा दिग्दर्शित “सलीम लंगडे पे मत रो” चित्रपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले. देशातील वाढता धार्मिक उन्माद आणि त्यामागील राजकारणाबद्दल हा चित्रपट भाष्य करतो. 1989 साली प्रसिद्ध झालेल्या या चित्रपटाची प्रासंगिकता आजही धडधडीत जाणवते. जातीधर्मांमध्ये द्वेष वाढवणे, आणि मंदिर मशिदीच्या मुद्द्यांना वापरून लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आज जोमाने सुरू आहे. चित्रपट उत्कृष्ट पद्धतीने दाखवतो की कसे कामगारांच्या मुलांना गुंडगिरीकडे नियोजनबद्ध पद्धतीने वळवले जाते. शाळांच्या वाढत्या फीज कामगारांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवतात आणि बेरोजगारीची टांगती तलवार सतत भविष्यावर एक प्रश्नचिन्ह उभे करते. अशा परिस्थितीत चोरी, तस्करी अशा कामांकडे युवक वळतात. कामगार वस्त्यांमध्ये नशा, गुन्हेगारी, देह विक्री, एक धंदा म्हणून जाणून बुजून पसरवले जाते. दंगली का घडवल्या जातात या प्रश्नाचे उत्तर ही फिल्म देते. सामान्य कामगार-कष्टकरी जनतेच्या आयुष्याच्या परिस्थिती बद्दल सरकार मध्ये बसलेल्या नेत्यामंत्र्यांना जाब नाही विचाराला जावा म्हणून जातीमध्ये आणी धर्मा-धर्मा मध्ये दंगली हेच नेता-मंत्री, त्यांचे मालक म्हणजेच श्रीमंत धनदांडगे भांडवलदार आणि ठेकेदार, आणि त्यांचे पाळीव दलाल भडकवतात. गुन्हेगारीच्या जगात एकदा घुसले की त्यातून बाहेर पडणे किती कठीण असते हे चित्रपटाचा नायक सलीमच्या आयुष्याच्या माध्यमातून चित्रपट दाखवतो. चर्चेमध्ये सर्व सहभागी जणांनी एकमत दर्शवले की राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या नावाखाली देशातील मोदी सरकार स्वतःचे अपयश आणि पूर्ण न केलेली आश्वासने लपविण्याचा प्रयत्न करत आहे. बेरोजगारी आणि महागाईची जी भयावह अवस्था आज तरुणांना आणि सामान्य जनतेला सोसायला लागतीये, त्या बद्दल येत्या निवडणुकी मध्ये यांना जाब नाही विचारला जावा, आणि “आम्ही राम मंदिर बांधलं” येवढ्या एका मुद्द्या वर भाजप निवडणूक लढवण्यात इच्छुक दिसते. या वेळी लोकांमध्ये जाऊन जनतेचे खरे मुद्दे काय आहेत हे स्थापित करणं सर्व संवेदनशील आणि न्यायप्रिय लोकांची जबाबदारी आहे असे सगळ्यांचे मत होते. नौभासतर्फे अशा अनेक फिल्म स्क्रिनिंग आणि चर्चा सत्र आणि इतर कामं मुंबईतील मानखुर्द-गोवंडी भागात आयोजित केली जातात. नौजवान भारत सभेसोबत जोडून घ्या आणि एका समतामुलक आणि न्याय्य समाजाच्या जडणघडणीत आपला सहभाग सुनिश्चित करा. संपर्क – 9930095381

Related posts

Leave a Comment

fourteen − 5 =