एफ.टी.आय.आय. व ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या फॅसिस्ट हल्ल्याच्या विरोधात काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नौजवान भारत सभा आणि इतर सहयोगी संघटनांच्या सहभागाने विरोध प्रदर्शन करण्यात आले

पुणे शहरातच गेल्या काही महिन्यांत विद्यार्थ्यांवर होणाऱ्या हल्ल्याची ही चौथी घटना आहे. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफ.टी.आय.आय.) येथे ‘राम के नाम’ या चित्रपटाचे प्रदर्शन केल्यामुळे हिंदुत्ववादी संघटनेच्या गुंडांनी येथील विद्यार्थ्यांवर नियोजनबद्धपणे हल्ला केला. तेथील सुरक्षारक्षकांनी त्यांना आत सोडले. 23 जानेवारी रोजी झालेल्या या हल्ल्यामध्ये स्पष्टपणे पोलीसही सहभागी होते हे दिसून आले, कारण पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित असून सुद्धा मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कुठलीही कारवाई केली नाही, उलट ज्यांना मारहाण झाली त्या विद्यार्थ्यांनाच ताब्यात घेऊन त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले. ही घटना ताजी असतानाच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रातील विद्यार्थी त्यांच्या परीक्षेसाठी नाटक सादर करत असताना धार्मिक भावना दुखावल्याचे निमित्त करीत अ.भा.वि.प. च्या गुंडांनी तिथे हैदोस घालत तेथील कलाकारांना जबर मारहाण केली. नेहमीaप्रमाणे इथेही पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली व ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांनाच अटक करण्यात आली. यामध्ये प्राध्यापक व कला शाखेच्या विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली. नौजवान भारत सभा कडून सहभागी झालेल्या साथी ललिता यांनी मांडले की या सर्व घटना हे स्पष्ट करतात की देशभरामध्ये धार्मिक उन्माद पसरवणाऱ्या या गुंड हिंदुत्ववादी संघटना विद्यापीठातील स्वतंत्र आवाजही दडपून टाकू पाहत आहेत. स्वतंत्र विचार करणारे, प्रश्न विचारणारे लोक या सत्ताधाऱ्यांना नको आहेत. महागाई व बेरोजगारी विरोधात आज देशभरामध्ये मोदी सरकार विरोधात जनतेमध्ये प्रचंड असंतोष असून जनतेने व युवकांनी व विद्यार्थ्यांनी या विरोधात आवाजच उचलू नये यासाठी धार्मिक उन्माद पसरवून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. यामध्ये प्रशासन व पोलीस संपूर्णपणे गुंडांच्या तालावर नाचत असून या गुंडांनी सत्ताधाऱ्यांचे अभय आहे हे स्पष्ट आहे. याच गुंडागर्दीचा विरोध करत आज आपले लोकशाही व नागरी अधिकारांवरील लढा तीव्र करणे गरजेचे आहे आणि यासाठी सर्व विद्यार्थी तरुणांनी संघटित होणे गरजेचे आहे. #protest #democraticright #civilrights #fascism #studentunity #NaujawanBharatSabha

Related posts

Leave a Comment

sixteen − twelve =