नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरात ‘द लेजंड ऑफ भगतसिंह’ चित्रपट दाखवला गेला.

केंद्रातील फॅसिस्ट मोदी सरकार दिल्लीत प्रजासत्ताक दिनाचा भव्य देखावा करण्याच्या फक्त दोन दिवस आधी 24 जानेवारी रोजी मुबई, मानखुर्द, साठे नगर मधील तब्बल 1200 हून अधिक घरे असलेल्या वस्तीवर महाराष्ट्रातील भाजप – शिंदे सरकार द्वारे बुलडोझर चालवला गेला. नौजवान भारत सभा सक्रियपणे या भागात कार्यरत आहे आणि वस्तीतील लोकांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या घराच्या हक्कासाठी लढत आहे. भगतसिंहाचे शब्द – “दिल्लीतील गोऱ्या सरकारच्या जागी भुरे सरकार” साठे नगरमधील प्रत्येकाच्या कानात दुमदुमत आहेत. सर्वांना घरे देण्याचे आश्वासन देत सत्तेत आलेल्या फॅसिस्ट सरकारने गेल्या 10 वर्षांत देशातील कामगार कष्टकरी जनतेलाच विस्थापित करण्याचे काम केले आहे. काँग्रेसने सुरु केलेले विस्थापनाचे काम अगदी अश्लील स्वरूपात भाजप सरकार पुढे रेटत आहे. आपण “बुलडोझर राज” मध्ये राहत आहोत असे भाजप सरकार अभिमानाने सांगते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरएसएस आणि संघ परिवाराने जनतेमध्ये जाती धर्माचे विष पेरण्याचे काम सुरु केले आहे. वाढत्या महागाई आणि बेरोजगारीपासून आपले लक्ष हटवण्यासाठी हे सर्व केले जात आहे. साठे नगर मध्ये नुकत्याच झालेल्या फॅसिस्ट रॅलीतून याची प्रचिती येते ज्यात धार्मिक भावना भडकवण्याचे काम अगदी नग्नपणे भाजपच्या नेत्यांकडू केले गेले आहे. हा चित्रपट याच धोक्याचा इशारा देतो, जेव्हा भगतसिंग आपल्याला सांगतात आपण धार्मिक आणि जातीय आधारावर आपापसात लढत असतो आणि आपले शोषक हसत असतात. आपल्या घरांवर बुलडोझर चालवला जात असताना, ते त्यांच्या आरामदायक अपार्टमेंटमध्ये जीवनाचा आनंद घेत असतात. केवळ आपल्या कामगार वर्गाच्या एकजुटीनेच आपण त्यांचा पराभव करू शकतो. आपण ज्या शोषक व्यवस्थेत राहतो त्यापासून स्वतःची सुटका करण्याचा हा एकमेव मार्ग आहे, जिथे छोटासा श्रीमंत वर्ग आपली सत्ता टिकवण्यासाठी राज्य यंत्रणा वापरून सर्व संसाधनांवर नियंत्रण ठेवतो. नौजवान भारत सभेचे सदस्य ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नगर घर हक्क समिती’ सोबत काम करत आहेत. ज्यात प्रामुख्याने या गोष्टीवर भर दिला जात आहे की फक्त आणि फक्त जनतेतून येणारा दबाव आणि त्यांची एकजूट ही भविष्यातील कोणतीही तोडफोड थांबवण्यास सरकारी अधिकाऱ्यांना भाग पडू शकते. घर मिळणे हा आपला मूलभूत अधिकार आहे आणि त्यासाठी एकत्रितपणे लढा द्यावा लागेल. नौजवान भारत सभेचे सदस्य होण्यासाठी किंवा आमच्या उपक्रमात स्वयंसेवक होण्यासाठी संपर्क करा: 7667230795

Related posts

Leave a Comment

two × five =