नौजवान भारत सभेच्या शिक्षण सहायता केंद्राकडून जनता वसाहत येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 12 दिवसांच्या गणिताच्या क्रॅश कोर्सचे आयोजन.

साथींनो, मागच्या 7-8 महिन्यांपासून जनता वसाहत येथे नौजवान भारत सभेकडून 8वी, 9वी, 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी नियमित शिक्षण सहायता केंद्र चालवण्यात येते. ज्यात गणित, इंग्रजी, विज्ञान हे विषय शिकवले जातात. वैज्ञानिक प्रयोग, मुव्ही स्क्रिनिंगसारखे उपक्रम देखील जनतेच्या आर्थिक सहयोगातून दाखवले जातात. 1 मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरु होत आहेत, विद्यार्थी आणि पालकांकडून गणित विषयाचा क्रॅश कोर्स घ्यावा ही मागणी येत होती. त्यासाठी मागच्या 12, 13 फेब्रुवारीला वस्तीमध्ये घरोघरी जाऊन क्लाससाठी 10 वीच्या विद्यार्थ्यांची नोंदणी अभियान चालवले आणि 14 फेब्रुवारीपासून 12 दिवसांचा गणिताचा क्रॅश कोर्स चालू केला आहे. शिक्षण सहायता केंद्र आणि यासारखे उपक्रम नियमित चालू ठेवण्यासाठी, त्यात इतिहास- राज्यशास्त्र , भूगोल, भाषा, चित्रकला, संगीत यांसारखे इतर विषय शिकवण्यासाठी, विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी, वैज्ञानिक दृष्टिकोन उंचावणाऱ्या उपक्रमांची भर घालण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त तरुण – तरुणींना शिक्षण सहायता केंद्राचे स्वयंसेवक बनण्याचे आणि आर्थिक सहयोग करण्याचे आवाहन करत आहे. नौभासच्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा. रवीशंकर +918956840785 #learning #teaching #science #mathematics #righttoeducation #EducationForAll #pune #bhagatsingh #nbs

Related posts

Leave a Comment

one × five =