नौजवान भारत सभा, मुंबईने “शहीद भगतसिंह स्मृति संकल्प अभियान” मुंबईतील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये आयोजित केले

 

 

 

 

 

शहीद भगतसिंह यांच्या 117 व्या जन्मदिवसाच्या निमित्ताने, नौजवान भारत सभा (मुंबई) “शहीद भगतसिंह स्मृति संकल्प अभियान” मुंबईतील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये आयोजित केले जात आहे. शहीद भगतसिंह आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा संदेश घेऊन, नौजवान भारत सभा, मुंबईने मानखुर्द मधील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये गौहर रझा यांचा “इंकलाब” हा माहितीपट दाखवला. या माहितीपटात आपल्या क्रांतिकारकांचा क्रांतिकारी प्रवास आणि ब्रिटिश साम्राज्यवादाने त्रस्त असलेल्या भारतात समाजवाद निर्माण करण्याचे त्यांचे स्वप्न दाखव  ले आहे. माहितीपटानंतर विद्यार्थ्यांशी देशातील सध्याच्या परिस्थितीबद्दल चर्चा करण्यात आली, देशातील आजची ही परिस्थिती आपल्या क्रांतिकारकांनी जो समाज घडवण्यासाठी जीवन समर्पित केले होते त्याच्या अगदी विरुद्ध आहे यावर भर देण्यात आला. नौजवान भारत सभेच्या सांस्कृतिक पथकाने सफदर हाशमी यांचे “राजा का बाजा” हे नाटक सादर केले, ज्यामध्ये सध्याच्या बेरोजगारीच्या संकटावर आणि शिक्षणाच्या वाढत्या खर्चासोबत रोजगाराची हमी नसल्यामुळे युवकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकला गेला. क्रांतिकारी गीते गायली गेली आणि क्रांतिकारी साहित्याचा एक स्टॉल देखील लावण्यात आला.

नौजवान भारत सभा, मुंबई पुढील आठवड्यात देखील अशा कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे.

“शहीद भगतसिंग स्मृति संकल्प अभियान” मध्ये सहभागी होण्यासाठी किंवा आर्थिक सहाय्य देण्यासाठी:

संपर्क: 7667230795, 9930095381
Gpay/UPI: shashanksaurav1995-2@okicici

Related posts

Leave a Comment

nineteen − 5 =