नौजवान भारत सभाकडून पॅलेस्टिनी जनतेच्या समर्थनार्थ पुण्याच्या सुपर भागात अभियान चालवले जात आहेत. त्याचा एक भाग म्हणून तरुणांशी संवाद करण्यासाठी मीटिंगचे आयोजन केले होते. या मीटिंगमध्ये सुरवातीला नौजवान भारत सभाची ओळख मांडण्यात आली. त्यानंतर साथी स्वप्नजाने पॅलेस्टिनी जनतेचा स्वातंत्र्य संघर्षाचा इतिहास मांडला. गेल्या 1.5 वर्षांमध्ये सुरू असलेल्या नरसंहारात पॅलेस्टाइनमध्ये 60,000 च्या वर सामान्य जनता मृत्युमुखी पडली आहे. एकूण 50000 लहान मुले जखमी किंवा मृत्युमुखी पडले आहेत. पॅलेस्टिनी जनतेचा हा संघर्ष वास्तवात गेल्या 77 वर्षांचा आहे. पॅलेस्टिनी जनता गेले 77 वर्षे त्यांच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहे. 1948 च्या पूर्वी इस्राएल या देशाचे नामोनिशाण नव्हते. 1948 मध्ये पॅलेस्टिनच्या भूमीवर इस्राएल नावाची सेटलर वसाहत बसवली गेली आणि तेव्हापासून पॅलेस्टिनी जनतेची लूट, त्यांच्या जमिनीवर, घरांवर कब्जा याचे सत्र सुरूच आहे. गेल्या 1.5 वर्षांमध्ये सुरू असलेले हत्याकांड त्याचाच एक भाग आहे. यानंतर साथी सुस्मितने भारतातल्या जनतेने या संघर्षात काय भूमिका घेतली पाहिजे यावर मांडणी केली. पॅलेस्टिनी जनतेच्या समर्थनार्थ जगभरात विद्यार्थी, कामगार कष्टकरी रस्त्यावर उतरत आहेत. भारताचा गोदी मीडिया या संघर्षाचे वास्तव सामान्य जनतेपर्यंत पोहोचू देत नाहीये. भारतातल्या जनतेने सुद्धा 200 वर्षे साम्राज्यवाद्यांची गुलामी सहन केली आहे. इथल्या जनतेने एकत्र येऊन ब्रिटिशांना या देशातून हाकलून लावले. पण त्याच वेळी पॅलेस्टिनी जनता 21व्या शतकात स्वतंत्र होऊ शकलेली नाहीये. म्हणून हे साहजिकच आहे की भारतातल्या न्यायप्रिय जनतेने पॅलेस्टिनी जनतेच्या समर्थनार्थ उभे राहिले पाहिजे. मीटिंगमध्ये उपस्थित सर्व साथींनी हा मुद्दा अजून लोकांपर्यंत घेऊन जाण्याचे निश्चित केले. इंकलाब झिंदाबाद! पॅलेस्टिनी जनतेचा मुक्तीसंघर्ष झिंदाबाद! झायनवाद मुर्दाबाद!
नौजवान भारत सभाकडून पॅलेस्टिनी जनतेच्या समर्थनार्थ पुण्याच्या सुपर भागात अभियान, तरुणांशी संवाद करण्यासाठी मीटिंगचे आयोजन
