नौभास, पुणे तर्फे पर्यावरणावर आधारित एका माहितीपटाचे आणि ‘आत्मपॅंफलेट’ या मराठी चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले

nbs film screening

नौभास, पुणे तर्फे चित्रपट प्रदर्शनाचे आयोजन 🎥🎞️📽️🎬 शहीद भगतसिंह वाचनालय, जनता वसाहत येथे तरुणांसाठी पर्यावरणावर आधारित एका माहितीपटाचे आणि ‘आत्मपॅंफलेट’ या मराठी चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले आणि नंतर त्यावर चर्चा करण्यात आली. पर्यावरणाचे संकट तीव्र होत असताना त्यावर जनसामान्यांमध्ये चर्चा होणे आवश्यक आहे. उपस्थितांनी पर्यावरणाचे संकट तीव्र होण्यामागच्या कारणांवर चर्चा केली. भांडवलशाहीच्या मागच्या ३०० वर्षाच्या काळात पर्यावरणाचा विनाश अफाट गतीने झाला आहे. त्याची चिंता न करता नफ्याच्या हव्यासापोटी आज निसर्गाचा अनिर्बंध वापर जगातील सर्वच भांडवलदार करत आहेत. जोपर्यंत उत्पादनाच्या प्रक्रियेवर मुठभारांची मालकी असेल, तोपर्यंत समाजाचा विचार न करता नफाकेंद्री उत्पाद

न होत राहील. स्वच्छ हवा, पाणी, अन्न मिळण्यासाठी आज एका समाजकेंद्री उत्पादनाच्या व्यवस्थेची गरज आहे. परंतू, आज जनतेच्या खऱ्या प्रश्नांवर न बोलता धर्मवाद नावाच्या विषारी सापाच्या विळख्यात सामान्य कष्टकरी जनतेला अडकवले जात आहे. शाळकरी मुलांपासून ते तरुणांपर्यंत आज अल्पसंख्याकांबद्दल द्वेष, घृणा आणि तिरस्कार वाढलेला दिसत आहे. परंतू याच्या कारणांवर बोलले असता कोणतेच ठोस कारण मिळत नाही. खोट्या माहितीचा प्रचार, वाढलेली असुरक्षितता, खऱ्या माहितीचा अभाव, चिकित्सक वृत्तीचा अभाव ही याची मुख्य कारणं जाणवतात. ‘आत्मपॅंफलेट’ या सिनेमाद्वारे शाळकरी मुलांमध्ये वाढत असलेल्या धार्मिक आणि जातीय भेदभावावर विनोदी पद्धतीने टीका करत एक समानतेचा संदेश दिला आहे. त्यावर उपस्थित तरुणांनी सहमती दर्शवली आणि चर्चेचा शेवट मेहनत करणाऱ्या जनतेने एकोप्याने रहिले पाहिजे आणि तेढ करणाऱ्यांचा विरोध केला पाहिजे असा झाला. #filmscreening

Related posts

Leave a Comment

3 + 15 =