♦️नौजवान भारत सभा, मुंबई द्वारे संचालित ‘शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्रात’ दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सत्र आयोजित करण्यात आले.♦️

मित्र-मैत्रिणींनो, नौजवान भारत सभा, मुंबई द्वारे संचालित शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्रामध्ये नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नियमितपणे अभ्यास वर्ग सुरू आहेत. आगामी बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहेत. यात हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, मराठी इत्यादी विषयांसाठी अतिरिक्त शिकवणी वर्गांचा समावेश आहे. यामध्ये शंका निरसन सत्र, सराव परीक्षा घेणे आणि इतर महत्त्वाचे विषय पुन्हा शिकवले जात आहेत. आम्ही मानतो की सर्वांना निःशुल्क, समान आणि दर्जेदार शिक्षण देणे ही सरकारची जबाबदारी आहे; परंतु सरकार शिक्षणक्षेत्रातील आपल्या जबाबदारी फेटाळून देत आहे. आजच्या नफेखोर भांडवली व्यवस्थेमध्ये शिक्षणाला एक बाजारू माल बनवले केले आहे. अशा परिस्थितीत आपण ‘निःशुल्क, समान आणि दर्जेदार शिक्षण’ मिळवण्यासाठी संघर्ष उभारण्याची गरज आहे, आणि त्यासोबतच आपण प्रत्येक व्यक्तीपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. समाजाकडून आपल्याला मिळालेले ज्ञान समाजापर्यंत परत नेणे हे आपले कर्तव्य आहे. म्हणून आम्ही सर्व न्यायप्रिय नागरिकांना आवाहन करतो की, त्यांनी प्रत्येक व्यक्तीपर्यंत निःशुल्क, समान आणि दर्जेदार शिक्षण पोहोचवण्याच्या संघर्षात आपली भूमिका सुनिश्चित करावी. नौजवान भारत सभेद्वारे संचालित शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्रामध्ये शिकवण्यासाठी आपला वेळ द्यावा. संपर्क:7667230795

Related posts

Leave a Comment

18 + three =