नौजवान भारत सभे तर्फे सुप्पर, बिबवेवाडी, पुणे येथे सुरू असलेला शहीद आझाद स्पोर्ट्स क्लब निरंतर सुरू

नौजवान भारत सभे तर्फे सुप्पर, बिबवेवाडी, पुणे येथे सुरू असलेला शहीद आझाद स्पोर्ट्स क्लब निरंतर सुरू गेल्या महिनाभर सुरू असलेल्या आझाद स्पोर्ट क्लब मध्ये आतापर्यंत बॅडमिंटन आणि फुटबॉल शिकवले गेले होते. त्यामुळे या आठवड्यात जेव्हा क्रिकेट खेळणार असे सांगितल्यावर मुलांमध्ये खूप उत्सुकता होती. ह्या आठवड्यात मुलांना क्रिकेटचे प्रशिक्षण देण्यात आले. बॉलिंग, बॅटिंग आणि क्रिकेट खेळाचे नियम शिकवण्यात आले. ह्या नंतर दोन संघांमध्ये विभागून एक क्रिकेटचा सामना खेळला गेला. सामना अतिशय रंगतदार झाला आणि मुलांना खेळायला मजा आली. तरीही मुलांनी दुसऱ्या दिवशी फुटबॉल खेळला जावा असा आग्रह धरला. आपल्या देशात क्रिकेट हा खेळ सगळ्यात जास्त लोकप्रिय आहे आणि सर्व लहान मुलांना क्रिकेट खेळण्याकडेच आकर्षण असते. परंतु जेव्हा त्यांना वेगवेगळया खेळांची ओळख दिली जाते आणि ते मनोरंजक व तांत्रिकरित्या बरोबर पद्धतीने शिकवले जातात तेव्हा मुलांना तेही खेळायला मजा येते. अशाच प्रकारे आणखी वेगवेगळे खेळ मुलांना शिकवण्यासाठी आम्हाला आर्थिक सहयोगाची गरज आहे ज्यातून नवीन क्रीडा साहित्याची खरेदी केली जाईल. सहयोगासाठी तपशील: Name: Susmit Rao Bank name: State Bank of India, Shahanoorwadi branch UPI: susmit410@ybl संपर्क 8329869421, 77096 72748

Related posts

Leave a Comment

four + 11 =