नौजवान भारत सभा, मुंबई द्वारे सुरू असलेल्या शहीद स्मृती संकल्प अभियानांतर्गत साठे नगर मधील खाडी आणि डब्बा कंपनी भागात रॅली काढून तसेच पत्रके वाटून क्रांतिकारकांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात खाडी भागातून केली गेली आणि समापन डब्बा कंपनी येथील वस्त्यांमध्ये करण्यात आले. ह्या त्याच वस्त्या आहेत जिथे नौभास अनेक वर्षांपासून स्थानिक तसेच राजकीय मुद्द्यांवर इथे राहणाऱ्या कष्टकरी जनतेसोबत मिळून संघर्षात सामील आहेत. विविध अभियानांमार्फत, क्रांतिकारी सुधारकार्याद्वारे जनतेच्या दैनंदिन जीवनाशी जोडले गेलेले आहेत. कट्टर, फॅशिस्ट, संधीसाधू शक्तींद्वारे क्रांतिकारकांच्या वारश्यावर धूळ आणि राख पसरवण्याच्या प्रयत्नांविरोधात भाषण आणि घोषणा देत एकदा पुन्हा आपल्या शहीद क्रांतिकारकांच्या वारश्याला, त्यांच्या संघर्षाला, तसेच त्यांच्या ‘लोक स्वराज’ बनवण्याच्या स्वप्नाला सत्यात उतरवण्याचे आवाहन केले. तसेच हे मांडण्यात आले की भगतसिंहाचा संघर्ष हा कसा खऱ्या अर्थाने कष्टकरी जनतेचा वारसा आहे. कष्टकरी जनतेत गेल्याशिवाय आणि क्रांतीसाठी जीवाची बाजी लावणाऱ्या, शेवटपर्यंत संघर्ष करणाऱ्या भगतसिंह, राजगुरू, सुखदेव यांसारख्या तरुणांशिवाय आजची अमानवीय भांडवली व्यवस्था आणि फॅशिझमला समूळ नष्ट करणे शक्य नाही. #bhagatsingh #sukhdev #rajguru #inquilab #zindabad
