नौजवान भारत सभाचा सदस्यता प्रदान कार्यक्रम संपन्न

नौजवान भारत सभाचा सदस्यता प्रदान कार्यक्रम संपन्न

दिनांक 22 मार्च 2025 रोजी नौजवान भारत सभेची शहीद भगतसिंह वाचनालय सुप्पर, पुणे येथे बैठक संपन्न झाली. गेला आठवडाभर 23 मार्च अंतर्गत पुण्यामध्ये विविध ठिकाणी बुक स्टॉल्स लावले गेले होते, त्यासोबतच वस्तीमधील युवकांसोबत बैठकी आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये अनेक युवकांनी सक्रियपणे सहभाग घेतला होता, तसेच त्यांनी नौजवान भारत सभेच्या कामांमध्ये सहभाग घेण्याचे दर्शवले होते. त्या अनुषंगाने आज 22 मार्च रोजी बैठक बोलवण्यात आली. यामध्ये अनेक नवीन साथींना सदस्यता देण्यात आली. या बैठकीची सुरुवात “रंग दे बसंती चोला” ह्या क्रांतिकारी गाण्याने झाली. त्यानंतर साथी सुस्मित यांनी नौजवान भारत सभेची ओळख दिली, त्यासोबत भगतसिंग, राजगुरू, सुखदेव ह्या क्रांतीकारकांचा क्रांतिकारी वारसा काय होता याबद्दल त्यांनी मांडणी केली. सोबतच नौजवान भारत सभाच्या देशभरातील कामांचा आढावा मांडला. त्यानंतर साथी स्वप्नजा यांनी शहीद दिवस (23 मार्च) बद्दलचा इतिहास सांगितला. तसेच भगतसिंग,सुखदेव,राजगुरू यांच्या विचारांना कुठल्याच सरकारने जनतेपर्यंत कधी पोहोचू दिले नाही म्हणून आपल्यावरच त्यांचे खरे विचार काय होते हे कष्टकरी जनतेपर्यंत घेऊन जावे लागेल याची जबाबदारी आहे हे मांडले. भगतसिंहानी तरुणांना हेच आवाहन केले होते की क्रांतीचा संदेश कारखान्यांमध्ये, कामगार वस्त्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी युवकांची आहे. जमलेल्या युवकांनी नौजवान भारत सभाच्या कार्यक्रमाला सहमती दर्शवली. त्यांना शपथपत्र वाचून सदस्यता देण्यात आली. यापुढे नौजवान भारत सभेचे काम शहरामध्ये वाढवण्याचा संकल्प करण्यात आला. त्यासोबत शिक्षण, रोजगार, आरोग्य, आवास यासारख्या मुद्द्यावर संघर्ष करण्याचा संकल्प करत कार्यक्रमाची सांगता झाली. इंकलाब जिंदाबाद! अमर शहीदों का पैगाम, जारी रखना है संग्राम! जाती धर्माचे झगडे सोडा, खऱ्या लढाईशी नाते जोडा! #bhagatsingh #sukhdev #rajguru #shahiddivas

Related posts

Leave a Comment

2 − one =