मानखुर्द – गोवंडी (मुंबई) मध्ये विरोध निदर्शने

दि ०७/१०/२०२० रोजी, मानखुर्द – गोवंडी मध्ये हाथरस आणि बलरामपूर येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणी मानखुर्द – गोवंडी मधील पिएमजीपी कॉलनी व संविधान चौक, लल्लुभाई कंपाऊंड येथे निदर्शने करण्यात आली.
देशभरात स्त्री विरोधी अन्याय अत्याचार आणि बलात्कार प्रकरणे आणि हाथरस व बलरामपुर याठिकाणी झालेल्या बलात्कार आणि हत्या या घटनेवर स्त्री मुक्ती लीग कडून डॉक्टर पूजा यांनी आपले म्हणणे मांडत योगी – मोदी सरकार वर जोरदार हल्ला चढवला. झालेल्या प्रकारात योगी सरकार हे आरोपीच्या बाजूने भूमिका घेत आहे आणि हे पहिल्यांदाच होते असे देखिल नाही. या अगोदर सुद्धा कठुवा, उन्नावं, बीजेपी मंत्री चिन्मयानंद या प्रकरणात देखील हेच पाहायला मिळाले .
त्यानंतर नौजवान भारत सभेकडून अविनाश कुमार यांनी आपले म्हणणे मांडत असे सांगितले की, बलात्कार करणाऱ्या नराधम व्यक्तींना हे दिवसेंदिवस बलात्कार करण्यासारखे अमानवीय कृत्य करण्यासाठी तेव्हा ताकत मिळते जेव्हा सत्ताधारी बिजेपी आरोपीच्या बाजूने उभी राहते. आरोपींना वाचवण्यासाठी बिजेपी सारख्या पक्षांचा आश्रय मिळणे हे फार दुर्देवी आहे. हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणात देखील आपल्याला हेच पाहायला मिळत आहे. आरोपीच्या बाजूने ठाकूर म्हणवल्या जाणाऱ्या उच्चवर्णीयांनी पंचायत भरवून आरोपींना पाठिंबा जाहीर केला आहे.
अशा प्रकारच्या घटनांचा भविष्यात प्रतिकार करण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची गरज आहे त्याशिवाय आहे त्या परिस्थितीत बदल होणार नाही.
पुढे अखिल भारतीय जाती विरोधी मंच कडून बबन ठोके यांनी नामदेव ढसाळ यांची कविता रक्तात पेटलेल्या अगणित असुर्यांनो या कवितेपासून सुरुवात केली.
रक्तात पेटलेल्या अगणित सुर्याँनो
रक्तात पेटलेल्या अगणित सुर्याँनो
तूमची आय-बहीण
आजही विटंबली जाते
हाटाहाटातून…
मवाल्यासारखे माजलेले
उन्मत्त नीरो
आजही मेणबत्तीसारखी जाळतात
माणसं
चौकाचौकातून…
कोरभर भाकरी पसाभर पाणी
यांचा अट्टाहास केलाच तर
आजही फीरवला जातो नांगर
घरादारावरून
चिँदकातले हात सळसळलेच तर
छाटले जातात आजही नगरानगरातून
रक्तात पेटलेल्या अगणित सुर्याँनो,
किती दिवस सोसायची ही
घोर नाकेबंदी
मरेपर्यँत राहयचं का असंच युद्धकैदी?
ती पाहा रे ती पाहा
मातीची अस्मिता आभाळभर झालीय
माझ्या यातनेनं आता
झिँदाबादची गर्जना केलीय
रक्तात पेटलेल्या अगणित सुर्याँनो,
आता या शहरा शहराला
आग लावत चला …
आग लावत चला …
– नामदेव ढसाळ
कवितेला अनुसरून आपल्याला रस्त्यावरील संघर्षासाठी जाती विरोधी प्रगतिशील आंदोलन अभी करण्याची गरज आहे. या बाबीला आधोरेखित केले तर जातीच्या व धर्माच्या तसेच अस्मितावादी आंदोलनाच्या माध्यमातून जातीचा खात्मा होणे कदापि शक्य नाही तर त्यासाठी सर्वांनी वर्गीय आंदोलनाच्या ताकतीला ओळखून आपल्या ताकतीचा वापर करून जाती विरोधी संघर्ष उभा करावा असे आपले म्हणणे मांडले.
इतर सहयोगी संघठना व स्त्री मुक्ती लीग, नौजवान भारत सभा, आणि अखिल भारतीय जाती विरोधी मंच यांचा या कार्यक्रमात सहभाग होता.
काही प्रमुख मागण्या :-
स्त्रियांवरील अत्याचार थांबलेच पाहिजेत!
हाथरसच्या बलात्काऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे!
जातीय अत्याचार थांबलेच पाहिजेत!
योगी सरकार राजीनामा द्या!
दोषी पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे
आपणही ह्या निदर्शनांमध्ये तसेच अभियानांमध्ये सामील व्हा, सामील होण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.
!
संपर्क:-
अविनाश 9082861727
बबन 9619039793

Related posts

Leave a Comment

nine + 13 =