मुंबई येथे ‘इब आले ऊ’ चित्रपटाचे स्क्रिनिंग

नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे मागील आठवड्यात ‘इब आले ऊ’ चित्रपटाचे स्क्रिनिंग केले गेले. हा सिनेमा 2020 साली कोरोना साथीच्या काळात प्रतीक वत्स या दिग्दर्शकाने बनावला आहे. चित्रपट एका कष्टकरी परिवाराची स्थिती, बेरोजगारी मुळे झालेली हलाखीची स्थिती सांगतो. कथेचा नायक अंजनी हा एक प्रवासी कामगार आहे, जो कामाच्या शोधात उत्तर प्रदेशातून दिल्लीला आला आहे आणि त्याच्या बहिणीच्या घरी राहत आहे. त्याचे शिक्षण पूर्ण झाले नाही आणि डिग्री नसल्याने त्याला हवी तशी नोकरी मिळत नाही, नाईलाजास्तव तो दिल्ली शहरात प्रशासकीय इमारतींमधील माकडांना हुसकावून लावण्याचे काम स्विकारतो जे त्याला जमत नाही. दुसरीकडे त्याच्या बहिणीचा नवरा एक सिक्युरिटी गार्ड आहे आणि पगार कमी असल्याने बहीण सुद्धा पिस रेट नी घरीच काम करते. ती प्रेग्नेंट ही आहे पण कामाच्या त्रासामुळे सतत आजारी असते. तिला सतत डॉक्टरकडे जावे लागते, पैसे कमी असल्याने दिलेल्या गोळ्यांचा कोर्स पूर्ण करू शकत नाही. डॉक्टर ही एक मध्यमवर्गीय स्त्री आहे, जी तिला फुकटचा सल्ला देते की कामाचा जास्त भार घेणे तिच्या आणि तिच्या बाळाच्या जीवाला धोकादायक ठरेल, जणू काही पिस रेट चे काम स्वखुशीने केलं जातं आहे, वरून ती तिच्या नवऱ्याला टोमणे मरते की ऐपत नसेल तर मुलं कशाला जन्माला घालायची.
सरकारने माकडे पळवण्याचे कंत्राट दिले आहे, त्यामुळे तोही जॉब सरकारी नाही, अंजनीला ते काम आवडत तर नाही आणि जमत ही नाही पण जॉब जाण्याची सतत भीती वाटत राहते, वरून कंत्राटदाराच्या शिव्या ऐकाव्या लागतात. बहीण रोज तासनतास जागून पिस रेट चे काम करत आहे आणि ठरलेल्या वेळेत काम पूर्ण नाही केले नाही तर तिलाही तिच्या कंत्राटदाराच्या शिव्या खाव्या लागतात, तो तिला घालून पडून बोलतो.
एकंदरीत हा सिनेमा, आपल्या मुस्कटदाबी करणाऱ्या, गळा घोटणाऱ्या समाजाचे चित्रण करतो. ज्यात नोकरी न मिळणे, चांगल्या नोकरीची मानसिकता, असंघटित कामगारांचा जीवन संघर्ष, मॉब लिंचींग ज्यात, माकडांना पळवून लावू शकतो पण मारले तर जमाव तुम्हाला ठेचून मरतो कारण माकडे ही हनुमानाचे वंशज आहेत, अशा अनेक सामाजिक समस्यांना आपल्या समोर ठेवतो.
हा सिनेमा भांडवली समजतात हे उघड करतो की आजच्या कामगार कष्टकरी जनतेच्या वाट्याला आयुष्भर जीहुजुरी करणे, अपमान सहन करणे, तडजोडी करणे एवढेच आहे.
सिनेमाच्या शेवटी अंजनीला नोकरीवरून काढले जाते आणि खूप शोधून ही दुसरी नोकरी मिळत नाही, शेवटी त्याच्या वाट्याला निराशावाद येतो आणि हा समाज ज्यात मानवता मरण पावत चालली आहे त्याला जिवंतपणे मारून टाकते.
सिनेमा पाहिल्यानंतर त्यावर चर्चा केली गेली ज्यात शेहबाझ ने सागितले की पैसे कमवणे है या समाजात, किती अवघड आहे. असिफ ने एका कचऱ्याची थैली विकणाऱ्या कामगाराचे जीवन किती हलाखीचे असते हे सांगितले, अविनाश म्हणाला की ह्या समाजात माणसांपेक्षा माकडांना किंमत दिली जाते आणि कामगारांचे आयुष्य किती खडतर आहे आणि दुसऱ्या बाजूला एक पैसेवाल्यांचा वर्ग जो कामगारांच्या श्रमाला लुटून जगत आहे. पूजाने सिनेमात मध्यमवर्गीय महिला डॉक्टर कडून फसवा नारीवाद आणि त्यामागचं वर्गचारीत्र काय आहे हे सांगितले. सिनेमाच्या शेवटी दाखवलेल्या निराशावादावर शशांक ने स्पष्ट केले की खरा दोष व्यक्तीचा नाही तर व्यवस्थेचा आहे.

Related posts

Leave a Comment

6 + fourteen =