दि. ३० ऑगस्ट २०१९ रोजी साठेनगर, मानखुर्द (मुंबई) याठिकाणी ‘लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या क्रांतिकारी विचाराचे खरे वारसदार कोण?’ या विषयाला घेऊन पूर्ण साठे नगर मध्ये अण्णाभाऊ यांच्या कविता, पोवाडे व साहित्यामधील परखड विचार पोस्टरच्या माध्यमातून ठीक – ठिकाणी लावण्यात आले

दि. ३० ऑगस्ट २०१९ रोजी साठेनगर, मानखुर्द (मुंबई) याठिकाणी ‘लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या क्रांतिकारी विचाराचे खरे वारसदार कोण?’ या विषयाला घेऊन पूर्ण साठे नगर मध्ये अण्णाभाऊ यांच्या कविता, पोवाडे व साहित्यामधील परखड विचार पोस्टरच्या माध्यमातून ठीक – ठिकाणी लावण्यात आले. त्यामध्ये ‘ही पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून, दलित – श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे. अशा प्रकारच्या वैज्ञानिक तर्कशील विवेकी व परंपरागत धार्मिक मूल्य मान्यता यांना छेद देणाऱ्या विचारांचा समावेश करण्यात आला तर,
मुंबईत उंचावरी ! मलबार हिल इंद्रपुरी ! कुबेराची वस्ती तिथे सुख भोगती !
परळात राहणारे ! रात्रंदिवस राबणारे ! मिळेल ते खाऊनीया पोट भरती !
अशा मुंबईच्या लावणीतून श्रीमंत आणि गरिबांची मुंबई असा स्पष्ट भेद सामान्या समोर मांडण्यासाठी अण्णाने लावणीला अत्यंत प्रभावीपणे वापरले होते. हीच लावणी आज देखील मुंबईचे चित्र पुन्हा एकदा नव्याने दाखवण्याचं काम करत आहे. अशा अनेक विचारांना व जाती-धर्म पलीकडील कष्टकऱ्यांच्या वर्गीय एकजुटीचा पुरस्कार करणाऱ्या लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांशी सामान्य जणांना अवगत करण्याचा हा प्रयत्न अत्यंत प्रभावी ठरला

Related posts

Leave a Comment

4 × five =