स्वातंत्र्यलढ्यातले शहीद क्रांतिकारक राजगुरू अमर रहे! क्रांतिकारक राजगुरू ह्यांच्या जन्मदिनी त्यांना क्रांतिकारी अभिवादन!

स्वातंत्र्यलढ्यातले शहीद क्रांतिकारक राजगुरू अमर रहे!
क्रांतिकारक राजगुरू ह्यांच्या जन्मदिनी त्यांना क्रांतिकारी अभिवादन!
राष्ट्रीय चळवळीतील एका महान आदर्शासाठी आपले प्राण अर्पण करणारे क्रांतिकारक राजगुरू यांचा आज जन्मदिवस आहे. इंग्रजी सत्तेच्या काळातील बॉम्बे प्रेसिडेन्सी मधील खेड येथे 24 ऑगस्ट 1908 रोजी राजगुरू यांचा जन्म झाला. आज खेड हे राजगुरूंच्या स्मृतीमध्ये राजगुरू नगर म्हणून ओळखले जाते जे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे. शिवराम हरी राजगुरू हे त्यांचे पूर्ण नाव. महाराष्ट्रात जन्माला आलेले राजगुरू तारुण्याच्या सुरवातीलाच क्रांतिकारक वैशंपायन ह्यांच्या सोबत झालेल्या अपघाती भेटींनंतर चंद्रशेखर आजादांच्या संपर्कात आले व त्या काळातील मुख्यतः पंजाब, बंगाल, उत्तरप्रदेश मधील क्रांतिकारकांमध्ये ते सामील झाले. राजगुरू हे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA) ह्या क्रांतिकारी संघटनेचे सदस्य व भगतसिंग, सुखदेव यांचे साथीदार होते. राजगुरू साँडर्सच्या हत्येच्या कटात सहभाग होते. 23 मार्च रोजी भगतसिंह, सुखदेव ह्यांच्यासोबत राजगुरू ह्यांनाही इंग्रजांनी फासावर चढवले. राजगुरू, भगतसिंग, चंद्रशेखर आजाद, सुखदेव, अश्फाक उल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल अशा अनेक क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.
हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA) च्या धारेतील क्रांतिकारी राष्ट्रीय मुक्ती व समाजवादी सत्ता म्हणजेच इंग्रजांच्या गुलामी पासून मुक्ती व स्वातंत्र्यानंतर देशातील सत्ता कामगार कष्टकऱ्यांच्या हातात येण्यासाठी संघर्षरत होते. पण प्रश्न आहे या सर्व क्रांतिकारकांना जसा स्वतंत्र भारत हवा होता तसा आज स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर देखील निर्माण होऊ शकला नाही कारण इंग्रज गेल्यानंतर देशाची सत्ता मुख्यतः भारतीय भांडवलदार वर्गाच्या हातात आली. क्रांतिकारकांची स्पष्ट भूमिका होती की, काँग्रेस आणि गांधीच्या नेतृत्वामध्ये जे स्वातंत्र्य मिळणार आहे, ते स्वातंत्र्य अर्धवट स्वातंत्र्य असेल. त्यामुळे मूठभर इंग्रज निघून जातील आणि भारतीय भांडवलदार, उद्योगपतींचे राज्य येईल आणि स्वातंत्र्यानंतर देखील हे शोषणाचे तंत्र आपले रूप बदलून याच पद्धतीने चालू राहील.
भांडवली सत्तेमुळे आज देशांतील परिस्थिती क्रांतिकारकांनी भाकीत केले होते तशीच आहे. 1 टक्के लोकांकडे 73 टक्के संपत्ती जमा झाली आहे. तर 10 टक्के लोकांकडे 85 टक्के संपत्ती जमा झाली आहे. यावरून हे कळते की श्रीमंत हा श्रीमंत होत चालला आहे आणि गरीब हा गरीबच होत चालला आहे. ही स्थिती आज भारतीय जनता पक्षाच्या सत्तेच्या काळात अत्यंत विदारक बनलेली आहे. आज सत्तेच्या दमनाविरुद्ध लढणाऱ्या प्रत्येक आवाजाला इंग्रजांच्या काळापासून चालत आलेल्या बर्बर काळ्या कायद्यांचा वापर करून दाबण्याचा प्रयत्न सर्रास होत आहे. जाती-धर्माच्या नावाखाली आज दिवसागणिक हत्या केल्या जातात. सांप्रदायिकतेचे विष पसरवणारे सर्वच हिंदू-मुस्लिम धर्मांध कट्टरपंथी व विशेषतः संघ परिवार व त्याच्या सहयोगी संघटना समाजामध्ये विभाजनाचे राजकारण सातत्याने वाढवत आहेत. आज अशा परिस्थितीमध्ये शहीद क्रांतिकारी राजगुरू, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सुखदेव अशा तमाम क्रांतिकारकांचा वारसा घेऊन सांप्रदायिक फासीवादी बीजेपी, आरएसएस व इतर सर्व संघटनां विरुध्द येणाऱ्या काळात मुकाबला केला जाऊ शकतो. यासाठी पुन्हा एकदा नव्याने क्रांतिकारकांच्या विचारांचा जागर करावा लागणार आहे. क्रांतिकारकांनी दाखवलेल्या मार्गाने त्याग, निष्ठा व समर्पित भावनेने जनतेला एकजुट करण्याचा संकल्प आज करूयात.
राजगुरूने दिला आवाज, बदल बदला देश समाज.
जाती धर्माचे झगडे सोडा, खऱ्या लढाईशी नाते जोडा.
भांडवलशाही मुर्दाबाद, साम्राज्यवाद मुर्दाबाद, इंकलाब जिंदाबाद!

Related posts

Leave a Comment

three × 3 =