महान जातीविरोधी योद्धे अय्यंकाली यांच्या जयंतीनिमित्त (28 ऑगस्ट) नौजवान भारत सभा आणि अखिल भारतीय जाती विरोधी मंच (ABJVM) तर्फे पुण्यातील दांडेकर पूल भागात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले

महान जातीविरोधी योद्धे अय्यंकाली यांच्या जयंतीनिमित्त (28 ऑगस्ट) नौजवान भारत सभा आणि अखिल भारतीय जाती विरोधी मंच (ABJVM) तर्फे पुण्यातील दांडेकर पूल भागात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. पदयात्रेमध्ये नौभास आणि अभाजाविम च्या कार्यकर्त्यांनी अय्यंकालींच्या लढ्याचा इतिहास जनतेसमोर मांडला. आज सुद्धा सुधारवाद आणि व्यवहारवादाचा विचार जातीअंताच्या आंदोलनात प्रभावी आहे. हाच विचार या आंदोलनाला अनेक दशकांपासून सरकारला अर्ज देणे, विनंत्या करणे, या नाही तर त्या भांडवली पक्षाचे शेपूट पकडून चालणे आणि अस्मितावादाच्या पोकळ विचारांच्या पुढे जाऊ देत नाहीये. अशामध्ये जातीअंताच्या आंदोलनाला योग्य रुपात पुढे नेण्यासाठी अय्यंकालींच्या आंदोलनाचा वारसा अत्यंत महत्वाचा आहे. अय्यंकाली यांनी सुधारणांसाठी अर्ज विनंत्यांचे काम नाही केले, उलट सडकेवर उतरून ब्राह्मणवाद्यांना खुले आवाहन दिले आणि त्यांना हरवले सुद्धा. अय्यंकालींनी सिद्ध केले की दडपलेली आणि अत्याचार झालेली लोकं ना फक्त लढू शकतात, तर जिंकू सुद्धा शकतात. अय्यंकालींचा वारसा आपल्याला दाखवतो की सत्तेच्या विरोधात मुलगामी संघर्ष आणि जाती अंताच्या लढाईमध्ये सर्व कष्टकरी जनतेला सोबत घेऊनच आपण जाती व्यवस्थेविरोधात योग्य पद्धतीने लढू शकतो.
जाती व्यवस्थेचा नाश होवो! ब्राह्मणवादाचा नाश होवो! भांडवलशाहीचा नाश होवो!
अय्यंकालींचा वारसा जिंदाबाद ! जातीअंताचा झुंझार संघर्ष जिंदाबाद !
वाऱ्याशिवाय ना पान हलते ! लढल्याशिवाय ना काही मिळते !

Related posts

Leave a Comment

thirteen − seven =