नौजवान भारत सभे तर्फे मानखुर्द – गोवंडी च्या कष्टकरी वस्त्यांमध्ये चालवण्यात येत आहे शहीद सुखदेव फिरते वाचनालय!

“पुस्तकं जादुई असतात
बघायचे असेल आपल्याला बाहेरचे जग तेव्हा एक उघडी खिडकी बनतात
कधी आरसा बनून आपला स्वतःशीच सामना करवतात
तर कधी विमान बनून आपल्याला ढगांची सैर करवतात
कधी आपल्या अंतर्मनाला गरम कोट बनून थंड होण्यापासून वाचवतात
कधी असेही होते,
वादळी अंधारलेल्या वाटेवर दीपस्तंभ बनून मार्ग दाखवून जातात!!”
मागील 2 वर्षांपासून नौजवान भारत सभा मानखुर्द – गोवंडी मधील विविध वस्त्यांमध्ये फिरते वाचनालय नियमितरित्या सुरू आहे. गौतम नगर, रफिक नगर, लल्लुभाई कंपाऊंड, साठे नगर ह्या वस्त्यांमध्ये सध्या फिरते वाचनालय चालवले जात आहे ज्याला सर्वच वस्त्यांमध्ये उत्तम प्रतिसाद आहे. लहान मुलं, महिला, युवक फिरत्या वाचनालयातील पुस्तकांचे नियमित वाचक आहेत. मराठी, हिंदी, इंग्लिश भाषेतील प्रगतिशील, मानवी मूल्य, वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा प्रचार प्रसार करणारं साहित्य नौजवान भारत सभा फिरत्या वाचनालयामार्फत ह्या वस्त्यांमधील घरो घरी नेत आहे. सांस्कृतिक, वैचारिक स्तरावर विचारधारा, मूल्य पसरवण्याच्या सर्वच संसाधनांवर शासक वर्गाचा कब्जा असल्याने सर्वच मूल्ये जी नफाकेंद्री भांडवली व्यवस्थेला मजबूत करण्यासाठी आवश्यक आहेत, घराघरांत रुजवली जातात. ही मूल्ये व्यक्तीला मानवीयतेपासून दूर नेणारी, माणसाला माणसापासून तोडणारी, विध्वंसक स्पर्धा वाढवणारी असतात. आज आपल्याला मुलांच्या स्वप्नांना वाचवायचे असेल, मानवीयतेला वाचवायचे असेल तर वस्त्या – वस्त्यांमध्ये, घरा – घरांमध्ये उत्कृष्ट, दर्जेदार असं प्रगतिशील साहित्य घेऊन जायला लागेल.
लिओ टॉलस्टॉय, मॅक्सीम गोर्की, रवींद्रनाथ टागोर, प्रेमचंद इत्यादी मानवता प्रेमी लेखकांचं साहित्य, जगभरातील जनतेचा अन्याया विरोधात लढलेल्या संघर्षांचा इतिहास, प्रेमाच्या, संघर्षाच्या कविता, बाल साहित्य, इत्यादी अधिकाधिक पुस्तकं गोवंडी – मानखुर्द मधील कष्टकरी वस्त्यांमध्ये पोहचवण्यासाठी सर्व न्यायप्रिय साथींनी नौजवान भारत सभे तर्फे चालवण्यात येणाऱ्या शहीद सुखदेव फिरत्या वाचनालयाला पुस्तकांचा, वेळेचा तसेच आर्थिक सहयोग करावा.
आर्थिक सहयोगासाठी तपशील :-
Name: AVINASH KUMAR
Account No. : 309011284569
IFSC Code: RATN0000284
Branch: AMBEDKAR GARDEN
Bank: RBL Bank
Gpay/phone pay-8826265960
शहीद सुखदेव फिरत्या वाचनालयात सामील होण्यासाठी संपर्क करा :-
अविनाश :- 8826265960
शशांक :- 7667230795

Related posts

Leave a Comment

13 − 12 =