शहीद स्मृती अभियानाअंतर्गत काल 23 सप्टेंबर रोजी पुणे येथील महाविद्यालयात “राजाचा वाजला बाजा” हे पथनाट्य सादर करण्यात आले

शहीद स्मृती अभियानाअंतर्गत काल 23 सप्टेंबर रोजी पुणे येथील महाविद्यालयात “राजाचा वाजला बाजा” हे पथनाट्य सादर करण्यात आले. नौभासकडून येत्या काळात विविध शाळा कॉलेजांमध्ये हे नाटक सादर करण्यात येणार आहे. हे नाटक आजच्या तरूणांसामोरील सर्वात ज्वलंत प्रश्नाला म्हणजेच बेरोजगारीच्या प्रश्नाला वाचा फोडते आणि भांडवली व्यवस्थेला सुद्धा प्रश्न विचारते. भारताच्या संविधानाने कलम 21 अंतर्गत सर्वाना सन्मानाने जगण्याचा अधिकार जरी दिला असला तरी रोजगाराचा अधिकार दिलेला नाही. रोजगाराच्या अधिकाराशिवाय सन्मानाने जगण्याचा विचार करणे अवघड आहे. भारतात सध्या बेरोजगरीचा दर गेल्या 45 वर्षांतला सर्वात जास्त आहे. त्यामुळे तरुणांमध्ये नैराश्याचं प्रमाण खूप वाढीस लागले आहे. अशा वेळेस तरुणांनी स्वत:ला दोष न देता जी व्यवस्था असे प्रश्न निर्माण करत आहे तिला जबाबदार धरत तिच्या विरुद्ध लढले पाहिजे, तसेच शहीद भगतसिंह, सुखदेव, राजगुरू तसेच त्या सर्व क्रांतिकारकांचा वारसा पुढे चालवला पाहिजे ज्यांनी शोषणरहित समाजाचे स्वप्न पाहत आपले प्राण दिले. नाटकानंतर पत्रक वाटून नौभासची ओळख सुद्धा विद्यार्थ्यांना देण्यात आली. भगतसिंह जन्मदिवसानिमित्त नौजवान भारत सभा तर्फे आयोजित वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्र, अभियानांमध्ये सामील होण्यासाठी संपर्क करा :-
सुस्मित – 8329869421
डॉ. नेहा -7769858775
इंकलाब जिंदाबाद!!
भगतसिंहाने दिला आवाज, बदला बदला देश समाज!!
भगतसिंहांच्या स्वप्नाला, साकार करा, साकार करा!!

Related posts

Leave a Comment

thirteen − three =