स्वामी अग्निवेश यांच्यावर भाजपच्या भाजयुमो च्या गुंडांचा हल्ला
जर आपण आता फासिस्ट संघी गटांचा सामना करायला रस्त्यावर उतरलो नाही तर कोणीच वाचणार नाही
17 जुलै ला देशात एक अजब घटना घडली. 17 जुलै ला झारखंडमध्ये जंगल वाचवण्याच्या मुद्द्यावर आदिवासींना संबोधित करायला गेलेले 80 वर्षीय स्वामी अग्निवेश यांच्यावर भाजपच्या भाजयुमो च्या गुंडांनी हल्ला केला. संघ व भाजपाचे हे गुंड 80 वर्षाच्या वयस्कर हिंदू धर्मीय संताला खाली पाडून ओढत लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत आई बहिणीवरून शिव्या देत होते
ही घटना भाजपा व संघाच्या हिंसक विचार-वर्तणुकीचा चेहरा स्पष्ट करते. या घटनेवर आता आपण गप्प राहू शकत नाही कारण आता गप्प राहणं हे मेलेले असल्यासमान असेल. पहलू खान, अखलाख, जुनैद आणि उना व भीमा कोरेगाव च्या नंतर अग्निवेश यांच्यावर हल्ला हे दाखवून देतो की फक्त मुसलमान व दलितच नाही तर हिंदुत्ववादी फासिस्तांच्या ह्या काळात, तो प्रत्येक व्यक्ती निशाण्यावर आहे जो मोदी सरकार आणि संघ परिवार यांच्यासमोर नतमस्तक होण्यास नकार देतो. आर्य समाजी आणि समाज सुधारक असणारे स्वामी अग्निवेश गेल्या चार दशकांपासून बालकामगार, वेठबिगारी अंधश्रद्धा आणि दारु विरोधी अभियान चालवत आहेत. तुम्ही स्वामी अग्निवेश यांच्या धर्मनिरपेक्ष किंवा हिंदू धर्माच्या अन्य विचारांबद्दल असहमती ठेवून सुद्धा त्यांच्या जनवादी अधिकारांसाठी उभे राहू शकता! स्वामी अग्निवेश यांच्या वर हल्ला केला गेला कारण त्यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली. तसे तर संघ परिवार व भाजपा त्या बलात्कारी संत व मौलवींच समर्थन करतात जे त्यांच्या फासिस्ट राजकारणाची पाठराखण करतात. आसाराम व त्याच्यासारख्या बलात्कारी बाबांसाठी रस्त्यावर उतरून संघ व भाजप प्रदर्शन करतो, परंतु हिंदू संत स्वामी अग्निवेश यांच्यावर हल्ला केला जातो कारण स्वामी अग्निवेश यांचं हिंदूधर्म, हिंदू जीवन शैली आणि हिंदू तत्वज्ञानाचा विचार संघ परिवाराच्या विचारधारेशी जुळत नाही. त्यांच्यावर यासाठी हमला केला गेला कारण त्यांनी फॅसिस्ट संघटनांद्वारे पसरविल्या जाणाऱ्या सांप्रदायिकतेचा विरोध केला, त्यांनी केंद्र सरकार व संपूर्ण राज्य सरकारांच्या जनताविरोधी धोरणांची टीका केली, त्यांनी योगी आदित्य आदित्यनाथ यांची दारूबंदी न केल्यामुळे टीका केली.
80 वर्षीय हिंदू धर्मीय या संता वर झालेल्या हल्ल्याने ह्या खोट्या प्रचाराचा पर्दाफाश झाला आहे की भाजपा व संघ परिवार हिंदूधर्म व हिंदूंची संरक्षक आहेत. जर ह्यांना हिंदू धर्माशी काही घेणे देणे असते तर त्यांनी स्वामी अग्निवेश वर हल्ला का केला असता? जर त्यांना हिंदू जनतेशी काही घेणे देणे असते तर ह्या देशातील 84 टक्के हिंदूंच्या जगण्यात सुधारणा झाली नसती का? का ह्या देशातील बहुतांश हिंदू लोकसंख्या बेरोजगारी, गरिबी आणि हलाखीचे जीवन जगत आहे? ह्या तथ्यांवरून हे सिद्ध होते की धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या आरोग्यावर ह्या देशातील सामान्य जनतेच्या हलाखीच्या परिस्थितीचा काही फरक पडत नाही. हिंदू धर्माचे संरक्षक बनण्याच्या आड ह्या सत्ताधाऱ्यांना केवळ एका धर्माच्या लोकांना दुसऱ्या धर्माच्या लोकांविरुद्ध भडकावून त्यावर स्वतःची भाकरी भाजून घ्यायची आहे.
यांना गौरक्षा सोबत सुद्धा काही घेणेदेणे नाही! जर यांचा उद्देश गायीची सेवा असता तर गायीच्या नावावर रस्त्यावर लोकांची हत्या केल्यानंतर बजरंग दल आणि भाजपा यांच्या लोकांनी अल दुवा कंपनीचे मालक संगीत सोम यांना पश्चिम उत्तर प्रदेश मधे मुख्य नेता का बनविले असते? त्यांनी देशातील सगळ्यात मोठया कत्तलखाण्यांकडून वर्गणी का घेतली असती? स्वतः गूगल वर सर्च करून बघा तुम्हाला कळेल की गायीच्या मांसाचा व्यापार करणाऱ्या कंपन्यांकडून सगळ्यात अधिक वर्गणी भाजपाने घेतली आहे. गौरक्षेच्या नावावर माणसांचा बळी घेणारी ही भाजपा मणिपूर व केरळ मधे गायीचं मांस खाण्याच्या बाजूने का उभी आहे? ह्यांना लव जिहाद सोबत सुद्धा काही घेणेदेणे नाही नाहीतर भाजप आणि संघ परिवाराच्या नेत्यांचे आणि त्यांच्या मुला-मुलींची लग्न मुसलमानांसोबत का झाली असती. त्यांचा एकमात्र उद्देश द्वेषाचे राजकारण करून लोकांना विभागणे आणि अंबानी व अदानी यांच्या संपत्तीत ‘दिन दुनि रात चौगुणी’ वृद्धी करणे हे आहे. संस्था उघडण्याआधीच अंबानी च्या संस्थेला 1000 करोड ची वर्गणी दिली जात आहे. जमीन, जंगल आणि देश मोठ्या भांडवलदारांना विकला जात आहे. यांचा उद्देश फॅसिस्ट शासन कायम करणे हेच आहे. संघाला कुठल्याच धर्मासोबत काही घेणेदेणे नाही आणि त्याला जनतेशीसुद्धा काही घेणे-देणे नाही! यांची विचारधारा फासिस्ट आहे जी लोकांचा आणि धर्माचा उपयोग करून भांडवलदारांची सत्ता देशात कायम करते आहे.
गेल्या चार वर्षात जे सव्वादोन करोड लोक बेरोजगार झालेत त्यात किती हिंदू होते आणि किती मुसलमान होते याचा हिशोब कोणी लावला आहे? किती सवर्ण होते आणि किती दलित होते? काय नोकरीवरून काढतांना कोणी जात धर्म विचारला होता काय? नोटबंदी मध्ये ज्या 200 लोकांचा मृत्यू झाला त्यात किती हिंदू होते व किती मुसलमान होते? किती सवर्ण होते आणि किती दलित होते? काय नोटबंदीमुळे मृत्यू होताना जात धर्म विचारला होता काय? जीएसटी लागू झाल्यानंतर जेवढे उद्योग बरबाद झाले आणि त्यामुळे कितीतरी लोक मजबुर होऊन रस्त्यावर आलेत त्यात किती हिंदू होते? मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे देशात जी हलाखी पसरली आहे तीने हिंदू-मुस्लिम भेद नाही केला! परंतु जेव्हा मत घ्यायची वेळ येते तेव्हा हिंदू-मुस्लिम विभाजन पद्धतशीरपणे केले जाते. स्वामी अग्निवेश वर हल्ला करून संघाने त्यांची हिंसक विचारसारणी व वागणूक पूर्ण उघड केली आहे. परंतु याचा मौन राहून सामना करणे शक्य नाही. या फॅसिस्ट आतंकवादी संघटना व्हाट्सअप्प वर अफवा पसरवून फक्त 8-10 च्या जमावात हल्ला करतात पण सोशल मीडियाच्या माध्यमातून देशात असा प्रचार करतात की जणू ही एक सामान्य घटना आहे,अशा घटना कुठे ना कुठे घडतच असतात.छोट्या छोट्या जमावाद्वारे या अशा घटना घडविल्या जातात कारण लोकांनी या गर्दीत बघे म्हणून उभे राहणे त्यांच्या अंगवळणी पडाव. परंतु आम्ही ही पराभवाची भावना अस्वीकार करतो, आम्ही अस्वीकार करतो हे म्हणनं की देशातील सर्व जनता अशीच आहे. आम्ही ह्या देशातील नौजवान, मजूर जनता आणि ह्या देशातील न्यायप्रिय लोकांना आवाहन करतो की रस्त्यावर उतरून ह्या फॅसिस्ट लोकांचा मुकाबला करा, कारण जर आता आपण उठलो नाही तर कुणीच वाचणार नाही!
कुठलाच पर्याय न निवडणे
गप्प राहणे
वा पुटपुटने अस्पष्ट शब्दांतून
वा सोपा-सुरक्षित मार्ग शोधून काढ़णे विरोध करण्यासाठी
हे सगळ
रानटीपणाच्या बाजुन उभे रहाण्याशिवाय
दुसरं काहीच नाही.
जातिधर्माचे झगडे सोडा, खऱ्या लढ्याशी नाते जोडा!
फासीवादाला उत्तर काय, इंकलाब जिंदाबाद!
नौजवान भारत सभा, दिशा विद्यार्थी संघटना, क्रांतिकारी मजदूर मोर्चा
मुंबई संपर्क:
9619039793, 9145332849
अहमदनगर संपर्क:
9156323976, 7385242011
पुणे संपर्क: 9422308125
ईमेल : naubhas@gmail.com फेसबुक पेज : www.facebook.com/naujavanbharatsabha
वेबसाइट : मराठी www.ma.naubhas.in हिन्दी www.naubhas.in