

नौजवान भारत सभा आणि स्त्री मुक्ती लीग तर्फे मुंबईतील साठे नगर, लल्लुभाई कंपाऊंड येथे शहीद स्मृती संकल्प अभियानाअंतर्गत 28 सप्टेंबर रोजी काफिला – ए – इंकलाब ‘ रॅली चे आयोजन करण्यात आले होते. शहीद भगतसिंहांच्या वैचारिक वारश्याला वेगवेगळ्या माध्यमांतून घरोघरी नेण्यासाठी काफिला – ए – इंकलाब मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, दफ्त्या, पोस्टर, क्रांतीकारी गीत, रॅप, पथनाट्य, पत्रक, भाषण, क्रांतीकारी साहित्याचे पुस्तक प्रदर्शन, पोस्टर प्रदर्शन, इत्यादी अनेक माध्यमांचा समावेश केला गेला. आदल्या रात्री वस्त्या वस्त्यांमध्ये जाऊन भगतसिंहांचे विचार लिहिलेले पोस्टर्स आणि काफिला – ए – इंकलाब साठी निमंत्रण देणारे पोस्टर्स चिटकवले गेलेत. रॅलीच्या दिवशी संविधान चौकात भगतसिंहांच्या कामगार कष्टकरी जनतेला जाती धर्माचे भांडण सोडून देऊन कामगार वर्गीय चेतनेच्या आधारे एकजूट होण्याचे भगतसिंहांच्या ‘सांप्रदायिक दंगे आणि त्यावरील उपाय ‘ ह्या लेखातील आवाहन करणारे मोठे बॅनर, पोस्टर प्रदर्शन तसेच जन चेतना तर्फे पुस्तकांचा स्टॉल लावण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमात ढोल – ताशा वादन, क्रांतीकारी गीतांची प्रस्तुती, रॅप, पथनाट्य – देशाला पुढे न्या, इत्यादी सादर करण्यात आलेत. रॅलीला सर्वच ठिकाणी उत्तम प्रतिसाद मिळाला. अनेक लोक रॅलीत सामील झालेत, पत्रक घेतलेत, शहीद क्रांतिकारकांच्या विचारांना जाणून घेत, आपल्या जीवनाची सद्यस्थिती त्यासोबत जोडून घेत नौजवान भारत सभा व स्त्री मुक्ती लीगच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी उत्सुकता दर्शवली. आर्थिक सहयोग देखील रॅली दरम्यान जमा केला गेला.
संपर्क :-
नौजवान भारत सभा – 8826265960
स्त्री मुक्ती लीग. – 7057088323
