बजरंग दलाच्या गुंडांनी हरियाणातील नरवाना येथे सुरू असलेल्या झुंजार जनएकजूट अभियानात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. जनतेने त्यांना चांगलाच चोप दिला!

बजरंग दलाच्या गुंडांनी हरियाणातील नरवाना येथे सुरू असलेल्या झुंजार जनएकजूट अभियानात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. जनतेने त्यांना चांगलाच चोप दिला!
सांप्रदायिक राजकारणाच्या विरोधात जनतेला एकजूट करण्याचा आमचा प्रयत्न नेहमी सुरू राहील!
जातीची अस्मिता सोडा,
कामकर्यांची एकजूट करा!
हरियाणातील नुंहू, मेवात, आणि इतर काही जिल्ह्यांमधे सांप्रदायिक दंगे भडकवणाऱ्यांच्या विरोधात नौजवान भारत सभा व अन्य जनसंघटनांद्वारे सुरू असलेले झुंजार जनएकजूट अभियान अविरतपणे सुरू आहे.
आज याच अभियानाला पुढे नेण्यासाठी नरवानामधील नेहरू पार्कमधे जनतेची एकजूट प्रस्थापित करण्यासाठी व्यापक चर्चा करून पत्रक वाटत अभियान सुरू होते. हे सुरू असतांनाच अभियानात बाधा आणण्यासाठी काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी कार्यकर्त्यांना धमक्या देण्याचा प्रयत्न केला. ते स्वतःला बजरंग दलाचे “पट्ठे” असल्याचे सांगत होते. काही वेळातच तेथे गुंडांची टोळी जमा झाली. हे सुरू असताना नौजवान भारत सभेचे कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने तिथे जमा झाले. जनएकजूटता अभियानाच्या कार्यकर्त्यांनी बजरंग दलाच्या गुंडांना पळवून लावण्यात नरवानाच्या न्यायप्रिय नागरिकांचे पूर्ण समर्थन मिळाले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन गुंडांच्या नेत्याला अटक केले.
सर्वसामान्य जनतेने या यात्रेला समर्थन दिले आणि नुंहू व मेवात या शहरांमध्ये पसरलेल्या हिंसेच्या घटनांसाठी सांप्रदायिक राजकारण पसरवणाऱ्या मोहिमांना जबाबदार ठरवले. तेथील प्रौढ व्यक्ती, महिला आणि युवकांचे स्पष्ट मत होते की या जनविरोधी शक्तींचे प्रयत्न हे जनतेमध्ये सांप्रदायिक हिंसा पसरवून येणाऱ्या 2024च्या निवडणुकांमध्ये जातीय/धार्मिक फूट पाडून मत मिळवणे हे आहे.
या अभियानादरम्यान जनतेला आवाहन केले गेले की आपापसात भांडण करण्यापेक्षा आपल्या मूलभूत हक्कांचे म्हणजेच शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यांचे बाजारीकरण करणाऱ्या धोरणांच्या विरोधात झुंजार एकजूट निर्माण करणे हे आपले प्राथमिक काम आहे. बजरंग दलातील सर्व जातीयवादी घटक आणि त्यांचे गुंड संपूर्ण हरियाणामध्ये जातीयवाद पसरवून दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना जनतेच्या एकजूटीने उत्तर दिलेच पाहिजे.
नाैजवान भारत सभा, हरियाणा

Related posts

Leave a Comment

three × two =